Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > क्राईम जगत

हिंगोली देशीदारू तस्करी

हिंगोलीत चार देशीदारूच्या बॉक्सासह मोटारसायकल जप्त

Hingoli Liquor smuggling: हिंगोलीमध्ये पोलीसांनी एका मोटारसायकलवरून चार देशीदारूचे बॉक्स जप्त केले. यात १९२ बाटल्या होत्या, अवैधरित्या विक्रीसाठी नेण्यात येत होत्या.


हिंगोलीत चार देशीदारूच्या बॉक्सासह मोटारसायकल जप्त

Hingoli Liquor smuggling |

अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाची कामगिरी

हिंगोली (Hingoli Liquor smuggling) : वसमत तालुक्यातील हयातनगर फाटा ते हयातनगर जाणार्‍या रस्त्यावर खदानी जवळ ११ एप्रिलला अप्पर पोलीस अधिक्षक कमलेश मिना यांच्या पथकाने मारलेल्या छाप्यात एका मोटारसायकल सह चार देशीदारूचे बॉक्स पकडले. (Hingoli Liquor smuggling) मोटारसायकल क्रमांक एमएच २६ सीसी २२९२ यावरून १५३६० रुपयाचे चार बॉक्स मध्ये १९२ देशीदारूच्या बाटल्या विक्री करण्याकरीता नेत असताना हयातनगर पाटी जवळ पोलीसांनी मोटारसायकल सह अवैध दारू असा एकूण ४५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या (Hingoli Liquor smuggling) प्रकरणी हट्टा पोलीसात सुमित टाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत बाबुराव सांडे, मगेश मारोती शिलार  रा. शहरपेठ वसमत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी अप्पर पोलीस अधिक्षकांच्या पथकातील संदिप पवार, सुमित टाले, विनोद कुटे यांच्यासह गणेश सुर्यवंशी, भारशंकर यांनी केली आहे.

Related to this topic: