Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

हिंगोली जुगार छापा

हिंगोलीत झन्ना मन्ना जुगारावर छापा; १ लाख १९ हजाराचा मुद्देमाल जप्त

Hingoli gambling raid: हिंगोली पोलिसांनी गणेशवाडीच्या शिवारात झन्ना मन्ना जुगार निषिद्ध करण्याच्या तसेच त्यावरील मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकूण १ लाख १९ हजाराचा माल जप्त


हिंगोलीत झन्ना मन्ना जुगारावर छापा १ लाख १९ हजाराचा मुद्देमाल जप्त

Hingoli gambling raid |

हिंगोली (Hingoli gambling raid) : शहरातील गणेशवाडी शिवारातील वीटभट्टीच्या पाठीमागे सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर हिंगोली शहर पोलिसांनी छापा मारून ६ जुगारांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून १ लाख १९ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. 

या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी अवैध धंदे चालता कामा नये, असा गर्भित इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी दिला आहे. गणेशवाडी शिवारातील वीटभट्टीच्या पाठीमागे २२ जून रोजी झन्ना मन्ना जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांना मिळाल्याने त्यांनी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, शंकर ठोंबरे, गणेश लेकुळे, संतोष करे, जोगे, जमादार शेख मोहसीन यांच्या पथकासह घटनास्थळी जाऊन छापा मारला.

सदर ठिकाणी नगदी १७ हजार ४०० रुपये, ४७ हजार रुपयाचे मोबाईल व ५५ हजार रुपयाची एक मोटार सायकल असा एकुण १ लाख १९ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या (Hingoli gambling raid) प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात शेख मोहसीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर कोंडबाराव शिंदे, बंडू लक्ष्मण घडाळे, अजय रामअप्पा होकर्णे, मनिष अर्जुनराव भगत, गुलाम अकबर गुलाम कादर, सतिष संतोष लोखंडे सर्व रा. गणेशवाडी रिसाला बाजार हिंगोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शेख हे करीत आहेत.