Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

हिंगोली अवैध दारू कारवाई

पुणे हातभट्टी दुर्घटनेनंतर राज्यभर कारवाईचा धडाका; हिंगोलीत अवैध दारूविरोधात 7 दिवसांत 37 गुन्हे दाखल

Hingoli Illegal Liquor Action: पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टीदारू सेवनामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे.


पुणे हातभट्टी दुर्घटनेनंतर राज्यभर कारवाईचा धडाका हिंगोलीत अवैध दारूविरोधात 7 दिवसांत 37 गुन्हे दाखल  

Hingoli Illegal Liquor Action |

हिंगोली (Hingoli Illegal Liquor Action) : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टीदारू सेवनामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सूचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आदित्य गो. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 29 मे ते 5 जून या कालावधीत व्यापक मोहीम राबवण्यात आली.  

राज्य उत्पादन शुल्क हिंगोली विभागाने या मोहिमेदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात छापे टाकून (Hingoli Illegal Liquor Action) अवैध मद्य विक्री, वाहतूक तसेच गावठी दारू निर्मिती अड्ड्यांवर कारवाई केली. या कारवाईत महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत 37 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान देशी मद्याच्या 180 मिलीच्या 444 बाटल्या, हातभट्टी दारू 154.5 लिटर, रसायन 660 लिटर व 3 दुचाकी वाहने असा एकूण 2,41,810 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  

ही मोहीम अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन मातकर, भरारी पथक निरीक्षक रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक टी.बी. शेख, कृष्णकांत पुरी, प्रदिप गोणारकर, ज्योती गुट्टे, स.दु.नि. कांबळे, जवान आडे, राठोड, चव्हाण, दिनेश राठोड, टेके, वाहनचालक वाघमारे व इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही अवैध मद्य खरेदी करू नये. तसेच हिंगोली जिल्ह्यात अवैध मद्य, बनावट मद्य, गावठी दारू निर्मिती अड्डे किंवा विक्रीची माहिती असल्यास विभागाशी संपर्क साधावा. यासाठी 02456-220106, टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 वर माहिती देता येईल.