Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > क्राईम जगत

हिंगोली अवैध धंद्या

हिंगोली जिल्ह्यात मागील महिन्यात अवैध धंद्याचे तब्बल ३३० गुन्हे दाखल; अवैध व्यवसाय उच्चाटनाला कोलदांडा

Hingoli illegal business: नांदेड पोलिसेसाठी उपमहानिरिक्षक शाहजी उमापाने जुलैत ३३० गुन्हे अवैध धंद्यावर पकडले. हिंगोलीतील सर्वाधिक कारवाई अवैध दारू व मटका


हिंगोली जिल्ह्यात मागील महिन्यात अवैध धंद्याचे तब्बल ३३० गुन्हे दाखल अवैध व्यवसाय उच्चाटनाला कोलदांडा

Hingoli illegal business |

 

जिल्हाभरात ३३० गुन्ह्यांमध्ये ४०९ आरोपीवर गुन्हे दाखल

हिंगोली (Hingoli illegal business) : जिल्ह्यात अवैध व्यवसाया वरूनच अनेक गंभीर गुन्हे घडले. एकीकडे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे अवैध धंद्याच्या विरोधात आक्रमक मोहीम राबवत असताना जिल्ह्यात अवैध धंद्याने अनेक ठिकाणी तोंड वर काढले. जिल्ह्यात ३३० गुन्हे दाखल झाले याचा अर्थ अवैध धंदे सुरू होते. 

नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शाहजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै महिन्यात राबविण्यात आलेल्या अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिमेत हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात गुटखा, मटका, जुगार, अवैध दारू, शस्त्रे आणि इतर अवैध व्यवसायांविरोधात एकूण ३३० गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणात ४०९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण १ कोटी ७९ लाख ५७ हजार ९४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई अवैध दारूविरोधात (Hingoli illegal business) करण्यात आली असून यासंदर्भात २२२ गुन्हे दाखल करून २२३ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. यात ५ लाख ६४ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर इतर अधिनियमांखाली ६१ गुन्हे दाखल करून ६९ आरोपींना पकडण्यात आले असून यातून १ कोटी ६२ लाख ७३ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मटका आणि जुगाराच्या ३८ प्रकरणात १०७ आरोपींवर कारवाई करत ७ लाख ५२ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुटखा विक्रीच्या ३ गुन्ह्यात ४ आरोपींना पकडून ३ लाख ४३ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर शस्त्र अधिनियमांतर्गत ६ गुन्हे दाखल करून ६ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे (Hingoli illegal business) अवैध धंद्यावरूनच जिल्ह्यात यापूर्वी अनेक अनुचित घटना घडल्या होत्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी जिल्ह्यात पदभार स्विकारल्या नंतर पोलिस अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीमध्ये अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही असा गर्भित इशाराही दिला होता. अवैध धंद्याच्या विरोधात त्यांची ठाम भूमिका असताना अनेक पोलिस ठाणे स्तरावर अवैध धंदे चालूच आहेत. विशेष म्हणजे अनेकवेळा मटका, जुगार आदी अवैध धंद्यावर छापे मारले जातात. परंतु हे अवैध धंदे ज्या ठिकाणाहून चालतात त्यातील मुख्य आरोपीवर गुन्हे दाखल होत नाहीत, या मागे नेमके काय दडलेय, हा विषय मात्र चर्चेचा बनला आहे. नव्याने रुजू झालेले पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा हे कर्तव्य कठोर अधिकारी म्हणुन ओळखले जात असताना गावपातळीवर मटका, गुटखा, अवैध दारू हे व्यवसाय चालतात कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.

अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-२ राबविण्यात येणार
 १ ऑगस्ट पासून नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-२ राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने दिली आहे. या मोहिमेत गुटखा, दारू, जुगार, अवैध वाळू वाहतूक आणि वेश्या व्यवसाय यांच्याविरोधात अधिक कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती ९१ ५० १०० १०० या 'खबर' हेल्पलाइन क्रमांकावर द्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Related to this topic: