Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > क्राईम जगत

ग्रामसेवक लाच प्रकरण

लाच प्रकरणात सवना येथील ग्रामसेवक निलंबित

Gramsevak bribery case:


लाच प्रकरणात सवना येथील ग्रामसेवक निलंबित

Gramsevak bribery case |

 

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले आदेश

हिंगोली (Gramsevak bribery case) : सेनगाव तालुक्यातील सवना गावात घरकुल योजनेच्या लाभार्थ्याकडून पाहणी अहवालावर सहीसाठी लाच मागणार्‍या ग्रामसेवकावर जिल्हा परिषदेने तातडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अडीच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर अवघ्या २४ तासांत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी त्यांचे निलंबन केले. 

गुरुवारी १४ मे रोजी सायंकाळी निलंबनाचे आदेश काढण्यात आले. सवना येथील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते. त्याचा पाहणी अहवाल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यासाठी ग्रामसेवक खिल्लारी (Gramsevak bribery case) यांनी सुरुवातीला पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोड होऊन अडीच हजार रुपये देण्याचे ठरले. या संदर्भात तक्रार मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू व सुलभा राऊत यांच्या पथकाने बुधवारी  १३ मे बुधवार रोजी गोरेगाव चौफुली येथे सापळा रचून खिल्लारी यांना लाच स्वीकारताना पकडले.

गोरेगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड यांनी तात्काळ अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर केला. (Gramsevak bribery case) अहवालात लाच घेण्यासोबतच पाणी टंचाईसारख्या महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता. या आधारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.