Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

आरोपी गौरेश बावणकर

अवमानना प्रकरणी आरोपी गौरेश बावणकर याला अटक

Accused Gauresh Bawankar: गौरेश बावणकर यांनी सोशल मिडीयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनुसूचित जातीच्या अवमाननेवरून गुन्हा दाखल केल्यानंतर अटक केली गेली.


अवमानना प्रकरणी आरोपी गौरेश बावणकर याला अटक

Accused Gauresh Bawankar |

 

आरोपीविरूध्द अ‍ॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल

गोंदिया (Accused Gauresh Bawankar) : बनावट आयडी तयार करून सोशल मिडीयावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरूध्द आक्षेपार्ह संदेश पोस्ट करून प्रसारित करणार्‍याविरूध्द डुग्गीपार पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली आहे. आरोपी गौरश बावणकर (Accused Gauresh Bawankar) रा.कोसमतोंडी याला काल (ता.८) अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्याची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपीविरूध्द अ‍ॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथील गौरश यशवंत बावणकर या इसमाने दिनेश ब्राम्हणकर या नावाने फेसबुकवर बनावट आयडी तयार केली. या आयडीच्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच अनुसूचित जाती प्रवर्गाला घेवून आक्षेपार्ह संदेश प्रसारीत केले. हा प्रकार ऑक्टोबर २०२५ ते ६ एप्रिल २०२६ दरम्यानचा आहे. या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले. आंबेडकरी बांधव रोशन बडोले यांनी ८ मे रोजी या संदर्भात डुग्गीपार पोलिस ठाण्यातंर्गत फिर्याद नोंदविली. फिर्यादच्या आधारावर प्रकरणाची चौकशी केली असता सदर बनावट आयडी गौरश बावणकर हाताळत असल्याचे समोर आले. यावरून गौरश बावणकर याच्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच काल डुग्गीपार पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आरोपी गौरश बावणकर याला तातडीने अटक केली. करण्यात आलेल्या आरोपीला काल न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान न्यायालयाने १९ मे पर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाला घेवून आंबेडकरी बांधवाचे चांगलेच मन दुखावले आहेत. विशेष म्हणजे, आरोपीविरूध्द अ‍ॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी पाटील करीत आहेत.

आरोपीसह पोस्टला सहमती दर्शविणार्‍यावर कारवाई करा: आंबेडकरी विचारमंच

मनावट आयडीच्या माध्यमातून गौरश बावणकर याने अनुसूचित जातीच्या संदर्भात अनेक आक्षेपार्ह पोस्ट केलीत. त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राची अवमानना केली. फेसबुकवर गलिच्छ विचाराला अनेकांनी देखील सहमती दर्शविली. या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरश बावणकर सह इतर आरोपींचा शोध घेवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आंबेडकरी विचारमंचच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षकांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलनाचा इशाराही आंबेडकरी विचार मंचच्या पदाधिकार्‍यांनी आयोजित पत्र परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यावेळी विश्वजीत डोंगरे, राजेश नंदागवळी, अजित मेश्राम, मिलिंद बागडे, किशोर मेश्राम, अतुल सतदेवे, हितेश डोंगरे, प्रविण बोरकर, अश्वजीत राऊत, भिमानंद मेश्राम, हिरालाल डोंगरे, शैलेश जांभुळकर, सलीम पठाण यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप जिल्हाध्यक्षांनी केले बावणकरला निलंबित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनुसूचित जाती अवमानना प्रकरणातील मुख्य आरोपी गौरश बावणकर (Accused Gauresh Bawankar) आहे. गौरश बावणकर हा भाजपचा जिल्हा सचिव देखील आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष सिताबाई रहांगडाले यांनी तातडीने कारवाई करीत पदावरून निलंबित केले आहे. निलंबनाच्या आदेशात महापुरूषांची अवमानना कदापी सहन करणार नाही, असाही संदेश जिल्हाध्यक्ष सौ.रहांगडाले यांनी दिला आहे.

Related to this topic: