Breaking News
  • वर्धा नदीत पाच मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला
  • पुणे विषारी दारू प्रकरण: राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.

होम > क्राईम जगत

कळमनुरी खून प्रकरण

कळमनुरी खून प्रकरणातील दोन फरार आरोपी; पाच तासांच्या नाकाबंदीनंतर वाशिममध्ये जेरबंद

Kalmanuri murder case: कळमनुरी खूनमिंडातील दोन मुख्य आरोपी फरार होते. पोलिसांनी पाच तासांची नाकाबंदी करून वाशिम जिल्ह्यातील महामार्गावर त्यांना पकडली.


कळमनुरी खून प्रकरणातील दोन फरार आरोपी पाच तासांच्या नाकाबंदीनंतर वाशिममध्ये जेरबंद

Kalmanuri murder case |

कळमनुरी (Kalmanuri murder case) : येथील साईनगर परिसरात 22 मे रोजी शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या निर्घृण खून प्रकरणातील दोन फरार मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिम जिल्ह्यातील महामार्गावर पाच तासांच्या नाकाबंदीनंतर अटक केली. कळमनुरी शहरातील खुल्या मैदानात नवनाथ शिवाजी बेद्रे  (23) राहणार कळमनुरी या युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याला ठेचून मारण्यात आले होते. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना अटक केली होती. मात्र गुन्ह्यातील मुख्य दोन आरोपी घटनेपासून फरार होते. 

फरार आरोपींना (Kalmanuri murder case) पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक आरोपींच्या मागावर होते. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाआधारे आरोपी वाशिम- अकोला महामार्गावरून प्रवास करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने वाशिम जिल्ह्यात महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली. 

या नाकाबंदी दरम्यान आरोपी आकाश विठ्ठल सातव, राहणार पाटील गल्ली कळमनुरी आणि भरत शंकरलाल यादव, राहणार साईनगर कळमनुरी यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही अटक करून अधिक तपासासाठी कळमनुरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

हि यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि पोलीस निरीक्षक मोहन भोसले, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सपोनि शिवसांब घेवारे, पोउपनि माधव जीव्हारे यांच्यासह पोलीस अमलदार गजानन पोकळे, सतीश जाधव, शिवाजी जाल्मिरे व हरिभाऊ गुंजकर यांचा समावेश होता.

Related to this topic: