Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > क्राईम जगत

विवाहित महिला आत्महत्या

परभणीत विवाहितेने घेतला गळफास;पोलीस पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा...!

Married Woman Suicide: 28 वर्षीय विवाहित महिला सोनम संदीप साळवे ने आत्महत्या केली। लग्नानंतर त्रासकारक वातावरणात पोलीस वसाहतीत गळफास किया। मुलीचे लग्न होण्यापूर्वी त्रास केला गेला


परभणीत विवाहितेने घेतला गळफासपोलीस पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा

Married Woman Suicide |

 

परभणी शहरातील पोलीस वसाहतीमधील घटना; त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

परभणी (Married Woman Suicide) : तुला मुलगी कशी झाली, मुलगा का झाला नाही, असे म्हणत टोमणे मारले तसेच तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये, असे म्हणून त्रास दिला. या त्रासाला कंटाळून २८ वर्षीय विवाहितेने २ जून रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पोलीस वसाहतीत गळफास घेतला. (Married Woman Suicide) विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्ती केल्या प्रकरणी पोलीस पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जयश्री बसवंते यांनी तक्रार दिली आहे. सोनम संदीप साळवे, वय २८ वर्ष, असे मयत विवाहितेचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मुलीचे लग्न पोलीस शिपाई संदीप साळवे यांच्यासोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवस चांगले नांदविल्यावर सासरच्या मंडळींनी विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली. तुला खर्च करण्यासाठी तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये, तुला मुलगी कशी झाली मुलगा का झाला नाही, असे म्हणत टोमणे मारले.

या त्रासाला कंटाळून विवाहितेने पोलीस वसाहतीत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Married Woman Suicide) केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी नवरा संदीप साळवे, सासू राधाबाई साळवे, नणंद सविता हिवाळे, नंदोई किशोर हिवाळे आणि दिराचा १७ वर्षीय मुलगा यांच्यावर परभणी शहरातील नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतले आहे.

Related to this topic: