Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > क्राईम जगत

भुमीअभिलेख कार्यालय लाचखोर

लाचखोर दोन भुकरमापकाचा परभणी कारागृहातील मुक्काम वाढला

Land Records Office Bribery: हिंगोलीत दोन भुकरमापक उमेश राऊत आणि अविनाश गोरे बासंबा शेतगटातील जमीन मोजण्यासाठी ४ हजाराचा लाच स्विकारताना पकडले गेले.


लाचखोर दोन भुकरमापकाचा परभणी कारागृहातील मुक्काम वाढला

Land Records Office Bribery |

 

दोघांच्या जामीन अर्जावर आता १ जूनला होणार सुनावणी 

हिंगोली (Land Records Office Bribery) : उपाधिक्षक भुमीअभिलेख कार्यालयातील दोन भुकरमापकास ४ हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने  २२  मे रोजी रंगेहात  पकडले  होते. प्रारंभी या  दोन्ही लाचखोरांना तीन दिवसाची पोलिस कोठडी  सुनावली होती. त्यानंतर १४ दिवस  न्यायालयीन कोठडी  सुनावली होती. त्यांच्या  जामीनावर  २८ मे रोजी सुनावणी होणार  होती. परंतु आता हि सुनावणी लांबणीवर गेली असून १ जून रोजी होणार आहे. त्यामुळे दोन्ही लाचखोरांना परभणी कारागृहातील मुक्काम आणखी काही दिवस वाढणार आहे.

हिंगोली भुमीअभिलेख उपाधिक्षक कार्यालयातील (Land Records Office Bribery) भुकरमापक उमेश मधुकर राऊत व अविनाश नंदकिशोर गोरे  या दोघांना बासंबा येथील शेत गट क्रमांक २५८ मधील शेत  जमिनीची मोजणी करण्याकरीता  ४ हजाराचा लाच घेताना त्यांच्याच कार्यालयात एसीबीच्या पथकाने  रंगेहात पकडले  होते. या प्रकरणात २२ मे रोजी हिंगोली शहर  पोलिसात  गुन्हा दाखल झाला. त्यांना  २३ मे  रोजी न्यायालयात हजर केले  असता तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली होती.

मुदत  संपल्याने न्यायालयात  हजर केले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी दोन्ही आरोपींच्या  जामीनसाठी  न्यायालयात  अर्ज दाखल केला असता त्यावर २८ मे रोजी सुनावणी ठेवली होती. परंतु हि सुनावणी आता १ जून रोजी होणार  आहे. त्यामुळे  दोन्ही लाचखोरांना जामीनसाठी आणखी काही दिवसाची प्रतिक्षा करावी लागणार  आहे.

Related to this topic: