Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > क्राईम जगत

परभणी वाळू माफिया

परभणीत वाळू माफियांची मुजोरी ; पोलिस पथकावर जीवघेणा हल्ला

Parbhani Sand Mafia: नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी आपली चुणूक दाखवायला सुरु केली आहे. जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला लगाम घालण्यास प्राधान्य दिले आहे.


परभणीत वाळू माफियांची मुजोरी  पोलिस पथकावर जीवघेणा हल्ला

Parbhani Sand Mafia |

जिंतूर तालुक्यात पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाचे छापे 
वाळूसह लांखो रुपयांचा मुद्देमाल  जप्त....!

जिंतूर (Parbhani Sand Mafia) : नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी आपली चुणूक दाखवायला सुरु केली आहे. जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला लगाम घालण्यास प्राधान्य दिले आहे. परभणीतील जिंतूर तालुक्यात शनिवार २३ मे रोजी चार ठिकांणी छापे मारुन लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र तालुक्यातील भोगावदेवी - इटोली रस्त्यावर कारवाई करत असताना वाळूमाफियांनी पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या अंगावर कार घालून जीवे मारण्यचा प्रयत्न केला. वाळूमाफियांची ही मुजोरी मोडून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. जिंतूर तालुक्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे पोलिस अधिक्षकांची याकडे वक्रदृष्टी पडली. शनिवार २३ मे रोजी तालुक्यातील चार ठिकाणी छापे मारुन वाळू माफिया विरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. यात मौ. सावळी येथील बसथांबा,  मौ इटोली ते घेवडा रोड, जिंतूर शहरातील सार्वजनिक रोड, आणि भोगाव देवी शिवारातील रोडवर अवैध वाळू वाहतुक करणार्‍या वाहनांवर छापे मारले. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कार, दुचाकीने केला माफियांनी पाठलाग

जिंतूर तालुक्यातील भोगावदेवी - इटोली रोडवर विशेष पथकाने एमएच -२२ एएन -  ६१८४ या क्रमांकाचा हायवा पकडला.कारवाई सुरु असताना सोमनाथ वरणकर, चंद्रकांत सुर्यवंशी, अजिंक्य जगताप, इंद्रजीत देशमुख यांनी ङनोव्हा कार आणि दुचाकीवरुन पाठलाग करत घटनास्थळी आले. त्यांनी (Parbhani Sand Mafia) चालकास कारमध्ये टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार आडवली, मात्र त्यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याच गोंधळात आरोपी शिवराज हळदे आणि सोमनाथ वरणकर हे दुचाकीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी घसरुण पडल्याने दोघेही जखमी झाले. याप्रकरणी पोउपनि.संदीप शिंदे यांच्या फिर्यादीवरुन सहा जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाळू आणि वाहने असा एकुण २० लाख ६० हजाराचा मु्द्देमाल जप्त केला.