Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > क्राईम जगत

बेरोजगारीमुळे आत्महत्या

रेल्वे रूळावर कटुन राकेश सुर्यवंशीची आत्महत्या

Rakesh Suryavanshi: राकेश सुर्यवंशी, एक २८ वर्षीय युवक, जो काम न मिळाल्यामुळे मानसिक त्रासात होता, त्याने रेल्वे लाईनवर रेल्वेखाली आत्महत्या केली.


रेल्वे रूळावर कटुन राकेश सुर्यवंशीची आत्महत्या

Rakesh Suryavanshi |

कन्हान (Rakesh Suryavanshi) : कामधंदा मिळत नसल्यामुळे राकेश सुर्य वंशी या युवकाने बेरोजगारी च्या मानसिक त्रासा ला कंटाळुन बोरडा रोड कडील रामटेक रेल्वे लाईन वर रात्री रेल्वेने कटुन आत्महत्या केल्याची घटना सामोर आली आहे.     

देविदीन शिवपाल सुर्यवंशी वय ५५ वर्ष राह.  सुखदेवे कॉलोनी, जे.एन. हॉस्पीटल जवळ वार्ड क्र.४ कांद्री यांचा मुलगा राकेश देविदीन सुर्यवंशी वय २८ वर्ष हा बेरोजगारीमुळे कुठलाही कामधंदा मिळत नस ल्याने रिकामा इकडे-तिकडे कामाच्या शोधात फिरत असल्याने मानसिक तणावात राहत होता. गुरूवार (दि .२६) ला रात्री ला राकेश हा जेवन करून घरा जवळी ल मंदीरात बसला होता. परंतु रात्री १० वाजता तेथुन तो निघुन गेला.

फिर्यादी मनोज सुर्यवंशी घरी झोपले असताना रात्री १२.१० वाजता म्हणजे शुक्रवार (दि. २७ ) मध्यरात्री त्याचा पुतण्या रितेष राममनोहर सुर्य वंशी याने फोन करून सांगितले की, राकेश सुर्यवंशी हा जे.एन. हॉस्पिटल सामोर शक्ती नगर कांद्री बोरडा जाणा-या रस्त्या वरील रामटेक रेल्वे लाईनवर रेल्वेने कटुन मृत्यु झाला आहे. असे माहित होताच काका मनोज सुर्यवंशी यांनी घटनास्थळी जावुन पाहिले तर राकेशचे डोके रेल्वे रूळा मध्ये तर रूळा बाहेर त्याचे शरीर पडले दिसले. यावरून राकेश ने बेरोजगारी ला कंटाळुन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

घटनास्थळी कन्हान पोलीसानी पोहचुन पंचनामा करून मृतदेह शवविच्छे दना करिता उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे पाठविला. फिर्यादी काका मनोज शिवपाल सुर्यवंशी वय ३८ वर्ष राह. सुखदेवे कॉलोनी, जे.एन. हॉस्पिटल जवळ वार्ड क्र ४ कांद्री (Rakesh Suryavanshi) मृतकाचा काका याचा तोडी बयाणा वरून कन्हान पोलीसानी मर्ग चा गुन्हा नोंद करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.

Related to this topic: