Amravati Murder Case: आमावटी नागपुरी गेटची पाण्याची टाकीमध्ये जिर्ण अवस्थेत मृतदेह आढळला. डोणारोपींना ताब्यात घेऊन खुनीच्या गुन्ह्यामध्ये सहभाग उघड केला. नसरीन बानो व शेख इकराम
डीएनए चाचणीने पटली मृताची ओळख; पत्नी व साथीदाराचा सहभाग उघड
क्लिष्ट खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने लावला छडा
अमरावती (Amravati Murder Case) : अमरावती शहरातील नागपुरी गेट परिसरात पाण्याच्या टाकीत आढळून आलेल्या जिर्ण अवस्थेतील मृतदेहाच्या अत्यंत क्लिष्ट व आव्हानात्मक खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण तपास करत छडा लावला आहे. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून मृत व्यक्तीची ओळखही डीएनए चाचणीद्वारे पटविण्यात यश आले आहे.
दि. १३ मे २०२६ रोजी नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत वजीर पटेल यांच्या बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत एका अनोळखी पुरुषाचा जिर्ण अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात अप. क्र. २५८/२०२६ अन्वये कलम १०३ (१), २३८ बीएनएस प्रमाणे (Amravati Murder Case) गुन्हा दाखल करण्यात आला होता.मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने मृताची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी अमरावती शहर व ग्रामीण भागातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासली असता नागपुरी गेट पोलीस ठाण्यात दि. ३१ मार्च २०२६ रोजी हलीमा बी अब्दुल अनीस (रा. अलीम नगर) यांनी त्यांचा मुलगा अब्दुल रियाज अब्दुल अनीस हा घरातून निघून गेल्याची मिसिंग तक्रार दाखल केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या डीएनए तपासणीत पाण्याच्या टाकीत आढळलेला मृतदेह हा अब्दुल रियाज अब्दुल अनीस (रा. अलीम नगर, अमरावती) यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हा घडल्यापासून (Amravati Murder Case) गुन्हे शाखा, अमरावती शहरकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. कोणताही ठोस पुरावा किंवा धागा उपलब्ध नसतानाही गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे नसरीन बानो अब्दुल रियाज (वय ३७, रा. अलकरीम नगर नं. २, अमरावती) आणि तिचा साथीदार शेख इकराम शेख चांद (वय २७, व्यवसाय- चालक, रा. सहारा नगर, अमरावती) यांचा गुन्ह्यात सहभाग उघड झाला.पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नसरीन बानो हिने तिचा साथीदार शेख इकराम याच्या मदतीने तिचा पती अब्दुल रियाज याला वडिलांच्या घरातून बोलावून घेतले. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेह शेख इकराम याच्या ऑटोमधून नेऊन वजीर पटेल यांच्या बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत टाकल्याचे निष्पन्न झाले.
या (Amravati Murder Case) प्रकरणात दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी नागपुरी गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) रमेश धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे विभाग) शिवाजी बचाटे व सहायक पोलीस आयुक्त (गाडगेनगर विभाग) कैलास फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, पोलीस निरीक्षक अतुल वर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे यांनी पार पाडली.दशरथ आडे, महेश इंगोले तसेच संपूर्ण गुन्हे शाखा पथक व सायबर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.गुन्हे शाखेच्या अथक प्रयत्नामुळे अखेर अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.