Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आरोग्य

परभणी जिल्हा रुग्णालय

जिल्हा रुग्णालयात जेष्ठ नागरीकांकडून फीस वसुली; अधिष्ठाता डॉ. चव्हाण यांचे दुर्लक्ष

Parbhani District Hospital: जिल्हा सामान्य रुग्णालयात जेष्ठ नागरिकांना व एम.एल.सी. धारकांना उपचारासाठी फीस वसुलीच्या नियमांचे उल्लंघन करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कृत्यावर प्रश्न खडते.


जिल्हा रुग्णालयात जेष्ठ नागरीकांकडून फीस वसुली अधिष्ठाता डॉ चव्हाण यांचे दुर्लक्ष 

Parbhani District Hospital |

 

कंत्राटी कर्मचारी भरतीचा उलट परिणाम

परभणी (Parbhani District Hospital) : मागील अनेक महिन्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या जेष्ठ नागरीकांकडून फीस वसुली करण्याचा प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. तसेच एम.एल.सी. चा रुग्ण आल्यावर देखील त्यांच्याकडून ही फीस घेतली जात आहे. हे नियमबाह्य काम तेथील वर्ग चारचे कर्मचारी करत असून याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ आर. बी. चव्हाण यांचे  दुर्लक्ष  होत असल्याचे दिसून येते.

परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा (Parbhani District Hospital) कारभार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्याकडे गेल्यापासून रुग्णसेवा व इतर सेवामध्ये मोठा ढिसाळपणा दिसून येत आहे. रुग्णांना वेळेवर न तपासणे व त्यांची सोय न घेणे असे प्रकार झाल्याने अनेक रुग्ण दगावले जात आहेत. साफसफाई देखील वेळेवर होत नसून कंत्राटी कर्मचारी फक्त नावालाच उरले आहेत. हे सर्व प्रकार होत असताना जेष्ठ नागरीक व एम. एल. सी. धारक रुग्णांच्या नातेवाईकाकडून फीस घेतल्याचे पुरावे घेवून रुग्ण देशोन्नती कार्यालयात आले आहेत. फिस न घेण्याचे आदेश असताना फीस कशाच्या आधारावर वसूल करत आहेत ? व ती फीस कोणाकडे जमा केली जात आहे ? असा प्रश्न पडत आहे. काही फिस हे कर्मचारी परस्परच घेवून खर्च करण्याचे काम करत असल्याचे बोलले जात आहे. आंतर-बाह्य रुग्ण विभागात फिस घेण्यासाठी वर्ग ३ चा कर्मचारी नियुक्त केलला असताना वर्ग ४ च्या कर्मचार्‍यांकडून हे काम करुन घेतले जात असल्याचे समोर येत आहे. असे प्रकार अधिष्ठाता डॉ. चव्हाण यांचे दुर्लक्ष असल्याशिवाय होवू शकत नाही. तेव्हा जेष्ठ नागरीकांकडून घेण्यात आलेल्या फीसची चौकशी करुन संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
 
जिल्हा रुग्णालयात (Parbhani District Hospital) आलेल्या रुग्णांना औषध न मिळण्याच्या तक्रारी देखील वाढतच आहेत. बाहेरुन औषध लिहुन दिले जात आहे. रुग्ण औषध आणण्यासाठी गेला असता १ वाजता कार्यालय बंद करुन कर्मचारी पसार होत आहे. तपासणीचा टाईम देखील १ वाजेपर्यंत आहे. तेव्हा २ वाजेपर्यंत औषध मिळणे गरजेचे आहे. तसेच इतर साध्या आजाराला लागणारे औषध देण्यासाठी कोणतीच सुविधा १ वाजल्यानंतर नाही. तेव्हा रुग्णांची होत असलेली हेळसांड याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

आरोग्य राज्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे
परभणीच्या पालकमंत्री ना. मेघना बोर्डीकर साकोरे यांच्याकडे आरोग्य खाते देखील आहे. त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात जेष्ठ नागरीकांकडून फीस आकारली जात आहे. तेव्हा त्यांनीही याकडे लक्ष देवून फीस न घेण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी होत आहे. असे अनेक नियमाबाह्य कामे चालू असल्याने  जिल्हा रुग्णालयातील कामांकडे राज्यमंत्र्यानी लक्ष देण्याची गरज आहे.