घोट आरोग्य तपासणी

पोलीस विभागाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Ghot Health Check: घोटमध्ये दिनांक 08 मे 2026 रोजी पोलीस मदत केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले. दत्ता मेघे हॉस्पिटलच्या टीमने शुगर, बीपी सह इतर आजारांची तपासणी केली.

पोलीस विभागाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Ghot Health Check

घोट येथे शेकडो नागरिकांनी घेतला आरोग्य लाभ

घोट (Ghot Health Check) : घोट पोलीस मदत केंद्राच्या वतीने दिनांक 08 मे 2026 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. दत्ता मेघे हॉस्पिटल, वर्धा येथील वैद्यकीय टीमने नागरिकांची आरोग्य तपासणी केली. शिबिरात शुगर, बीपी तसेच विविध लहान-मोठ्या आजारांची तपासणी करण्यात आली. गंभीर स्वरूपातील रुग्णांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.या आरोग्य शिबिराचे उद्घाटन घोट ग्रामपंचायतीच्या सरपंच रूपाली दुधबावरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालिनीताई मेघे हॉस्पिटल, नागपूर येथील डॉ. जीवक काकडे हे उपस्थित होते.

याप्रसंगी घोट पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, मानव अधिकार माहिती पत्रकार सेनेचे जिल्हाध्यक्ष रूम्पा शाहा, ग्रामपंचायत सदस्य आशा उपाध्ये, लीना विश्वास, डॉ. अंशिका पुनिया, डॉ. मेहता, डॉ. राहुल कुंभारे, डॉ. प्रकाश तसेच वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली. पोलीस विभागाच्या सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केले, तर संचालन फौजदार प्रकाश बर्डे यांनी केले. आभार प्रदर्शन गौतम दुर्गे यांनी मानले. कार्यक्रमाला घोट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

ठाकूरनगर परिसरात वाघाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी

ठाकूरनगर परिसरात वाघाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी

Ghot Tiger Attack: घोट नजीक ठाकूरनगर गावालगत वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) क्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ५२९ मध्ये गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास वाघाने गुराख्यावर हल्ला केल्याची घटना.

Sep 24, 2026
गोंदिया मालगोदामात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गोंदिया मालगोदामात मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Gondia Free Health Camp: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेतील नागपूर मंडळांतर्गत गोंदिया मालगोदाम येथे बुधवार, २३ सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वे मालगोदाम कामगार संघ मोफत आरोग्य तपासणी..

Sep 24, 2026
रिसोडच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकारामजी मोरे काळाच्या पडद्याआड

रिसोडच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकारामजी मोरे काळाच्या पडद्याआड

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन वेळा माजी सभापती तुकारामजी मोरे यांचे १९ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. सहकार क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले.

Sep 19, 2026
गुन्हेगारांशी जवळीक पडली महागात; पुणे पोलिस दलातील ३ कर्मचारी निलंबित

गुन्हेगारांशी जवळीक पडली महागात; पुणे पोलिस दलातील ३ कर्मचारी निलंबित

रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहिल्याप्रकरणी पुणे पोलिस दलातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. चौकशीनंतर अप्पर पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी आदेश दिले.

Sep 12, 2026
पुण्यात पोलीस ठाण्यातच महिला शिपायासोबत गैरवर्तन; हवालदार किरण देशमुख निलंबित

पुण्यात पोलीस ठाण्यातच महिला शिपायासोबत गैरवर्तन; हवालदार किरण देशमुख निलंबित

नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेतीलच एका घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Aug 17, 2026