Tukaramji More

रिसोडच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकारामजी मोरे काळाच्या पडद्याआड

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन वेळा माजी सभापती तुकारामजी मोरे यांचे १९ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. सहकार क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले.

रिसोडच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकारामजी मोरे काळाच्या पडद्याआड

Tukaramji More

घोटा गावच्या सरपंचपदापासून ते सहकार क्षेत्रातील नेतृत्वापर्यंतचा गौरवशाली प्रवास; तालुक्यावर शोककळा

रिसोड : रिसोड तालुक्यातील सहकार व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन वेळा माजी सभापती राहिलेले तुकारामजी मोरे (वय ७८, रा. घोटा) यांचे दिनांक १९ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण रिसोड तालुका आणि घोटा परिसरातील सहकार चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

स्व. तुकारामजी मोरे यांनी घोटा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण आणि कार्यकर्त्यांशी नाळ जोडून ठेवण्याच्या हातोटीमुळे त्यांनी सहकार क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची धुरा त्यांनी तब्बल दोन कार्यकाळ यशस्वीरीत्या सांभाळून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.

याशिवाय रामराव जनक जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्षपद, अनंत सूतगिरणीचे संचालकपद तसेच रिसोड खरेदी-विक्री संघाचे विद्यमान संचालक म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.

त्यांचे चिरंजीव प्रदीप मोरे हे घोटा ग्रामपंचायतीचे सरपंच असताना आणि सूनबाई सौ. शैलाताई मोरे या उपसरपंच असताना प्रदीप यांचे अकाली अपघाती निधन झाले होते. या अत्यंत कठीण प्रसंगात माहेरचे (वडील बाळासाहेब खरात) कणखर संस्कार लाभलेल्या सूनबाई शैलाताई यांनी घराची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

गेल्या २० वर्षांपासून त्यांनी कौटुंबिक व्यवहारांसोबतच सासरे तुकारामजी मोरे यांची मातृवत व अत्यंत निष्ठापूर्वक सेवा केली, ज्याची परिसरात नेहमीच आदराने चर्चा होते.

त्यांच्या पश्चात सहा मुली, सून, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी घोटा येथे भेट देऊन मोरे कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि स्व. तुकारामजी मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026