घोट (Ghot Tiger Attack) : घोट नजीक ठाकूरनगर गावालगत वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) क्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ५२९ मध्ये गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास वाघाने गुराख्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ठाकूरनगर येथील गणेशचंद्र खितीस दास (वय ४७) हे गंभीर जखमी झाले.प्राप्त माहितीनुसार, गणेशचंद्र दास हे जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेले असता अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. (Ghot Tiger Attack) वाघाच्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच घोट वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर वाडीघरे तसेच एफडीसीएमचे मुलचेरा वनपरिक्षेत्र अधिकारी गंजेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनेचा पंचनामा करण्यात आला. (Ghot Tiger Attack) वाघाच्या हल्ल्यामुळे ठाकूरनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घोट वाघ हल्ला
ठाकूरनगर परिसरात वाघाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी
Ghot Tiger Attack: घोट नजीक ठाकूरनगर गावालगत वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) क्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ५२९ मध्ये गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास वाघाने गुराख्यावर हल्ला केल्याची घटना.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Ghot Tiger Attack
टैग्स:
Ghot Tiger Attack