Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आरोग्य

डोळ्यांचे विकार (नेत्रदाह): आयुर्वेदिक उपचार


डोळ्यांचे विकार नेत्रदाह आयुर्वेदिक उपचार

आजच्या डिजिटल युगात मोबाईल, संगणक आणि टीव्हीचा वाढता वापर यामुळे डोळ्यांशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यापैकी 'नेत्रदाह' म्हणजेच डोळ्यांत जळजळ होणे ही अत्यंत त्रासदायक समस्या आहे.
* नेत्रदाहाची कारणे
नेत्रदाह अनेक कारणांमुळे होऊ शकतो. त्यातील प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे-
अति स्क्रीन टाईम - मोबाईल, लॅपटॉप यांचा दीर्घकाळ वापर केल्याने डोळे कोरडे पडतात. आयुर्वेदानुसार ज्ञानेंद्रियांचा अतियोग हे कारण येथे लागू पडते.
*धूळ व प्रदूषण - वातावरणातील धूळ, धूर यामुळे डोळ्यांत चिडचिड होते.
*अ‍ॅलर्जी- काही व्यक्तींना धूळ, परागकण किंवा रसायनांमुळे अ‍ॅलर्जी होते.
*उन्हाळ्यातील वातावरणातील अति उष्णतेमुळेसुद्धा नेत्रदाह होतो.
*इन्फेक्शन- बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे डोळ्यांत संसर्ग होतो.
*झोपेची कमतरता- अपुरी झोप घेतल्याने डोळ्यांवर ताण येतो.
*उष्ण, तिखट व आम्लयुक्त आहार- शरीरात पित्तदोष वाढवतो, ज्यामुळे नेत्रदाह होतो.
*नेत्रदाहाची लक्षणे
नेत्रदाहाची लक्षणे व्यक्तीनुसार बदलू शकतात; परंतु सर्वसाधारणपणे खालील लक्षणे दिसतात. डोळ्यांत जळजळ किंवा उष्णता जाणवणे, डोळे लाल होणे, पाणी येणे किंवा कोरडेपणा, खाज येणे, प्रकाश सहन न होणे, डोळ्यांत जडपणा किंवा वेदना.
*आयुर्वेदिक दृष्टीकोन
आयुर्वेदानुसार नेत्रदाह हा मुख्यतः पित्तदोष वाढल्यामुळे होतो. पित्ताचे गुण उष्ण व तीक्ष्ण असल्यामुळे डोळ्यांत जळजळ, लालसरपणा व सूज निर्माण होते. त्यामुळे उपचार करताना पित्त शमन करणे अत्यंत आवश्यक असते.
*आयुर्वेदिक उपचार
नेत्रदाह कमी करण्यासाठी खालील औषधे उपयुक्त ठरतात, त्रिफळा चूर्ण- डोळ्यांची स्वच्छता व पोषणासाठी उपयोगी, सप्तामृत लोह - दृष्टी सुधारण्यासाठी व दाह कमी करण्यासाठी, यष्टिमधु (जेष्ठमध) - शीतल गुणामुळे जळजळ कमी करते,
आमलकी (आवळा) - पित्तशामक व डोळ्यांसाठी पोषक, त्रिफळा  घृत - पोटात घेण्याकरिता तसेच नेत्रवस्तीकरिता अतिशय उपयोगी आहे.
ही औषधे तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
*पंचकर्म उपचार - आयुर्वेदात नेत्रदाहासाठी काही विशेष पंचकर्म उपचार अत्यंत प्रभावी मानले जातात.
नेत्र तर्पण/ नेत्र बस्ती - डोळ्याभोवती पिठाचा बांध करून त्यात औषधी तूप (घृत) ठेवले जाते. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो व दाह कमी होतो.
शिरोधारा- कपाळावर औषधी तेल किंवा काढ्याची धार दिल्याने मानसिक ताण कमी होतो व डोळ्यांवरील ताणही कमी होतो.
अंजन- औषधी अंजन लावल्याने डोळे स्वच्छ राहतात व दाह कमी होतो.
नेत्रदानासोबतच सर्व देहिक दाह असल्यास विवेचन चिकित्सासुद्धा चांगली उपयोगी आहे.
*आहार व जीवनशैली- पथ्यकर आहार विहार डायबेटिक रेटीनोपॅथी या आजारासाठी आवश्यक आहे. त्यासाठी थंड, शीतल व पचायला हलका आहार सेवन करावा तसेच आहारात आवळा, काकडी, कोथिंबीर यांचा समावेश असावा. रात्रीची पुरेशी झोप (७-८ तास) असलीच पाहिजे, डोळ्यांना विश्रांती देणे, डोळे बंद करून काही वेळ बसून राहणे, डोळ्यांवर दुधात किंवा गुलाब जलमध्ये भिजवलेल्या कापसाचे पट्ट्या ठेवणे.
*अपथ्यकार आहार -विहार- अति तिखट, मसालेदार व तेलकट पदार्थ टाळणे, दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहणे टाळावे, उष्ण वातावरणात जास्त वेळ राहणे टाळावे, धूळ व प्रदूषणापासून संरक्षण करावे. 
नेत्रदाह योग्य आहार, जीवनशैलीतील बदल आणि आयुर्वेदिक उपचार यांच्या साहाय्याने ही समस्या सहज नियंत्रणात आणता येते. डोळे हे शरीराचे अत्यंत मौल्यवान अवयव असल्याने त्यांची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

वैद्य पंकज कावरे
अमरावती, 
मो.नं.-९८२३०५१०३१

Related to this topic: