Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > शेती

सोयाबीनचे बोगस बियाणे

त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र धाड सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांची फसवणूक

Spurious soybean seeds: पैशासाठी वन वन फिरणारा शेतकरी बायकोचे मनी मंगळसूत्र मोडून सोयाबीन बियाणे खरेदीसाठी धाड येथील त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्रात जाऊन बियाणे खरेदी केले मात्र ते बियाणे उगलेच नाही.


त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र धाड सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांची फसवणूक

Spurious soybean seeds |

 

मुलाला दप्तर घेऊ शकलो नाही, बियाणे घेतले मात्र ते उगलेच नाही

बुलडाणा (Spurious soybean seeds) : तालुक्यातील मासरूळ येथील शेतकऱ्याची व्यथा पेरणीसाठी पैसा नाही आणि पेरणी करायची पैशासाठी वन वन फिरणारा शेतकरी बायकोचे मनी मंगळसूत्र मोडून सोयाबीन बियाणे खरेदीसाठी धाड येथील त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्रात जाऊन बियाणे खरेदी केले मात्र ते बियाणे उगलेच नाही. ६१२ महामंडळाचे सोयाबीन बियाणे किमान सात ते आठ शेतकऱ्यांनी खरेदी केले मात्र ते बियाणे कोणाचेच उगले नाही सदर शेतकरी त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्रातील संचालक यांच्याकडे गेले असता त्यांनी उडवा उडवी ची उत्तरे दिली.

बियाणे उगले नाही तो आमचा दोष नाही तो महामंडळाचा दोष आहे ते (Spurious soybean seeds) बियाणे महामंडळाचे आहे. तुम्ही महामंडळाकडे तक्रार करा अहो शेठ मी माझ्या मुलाला शाळा सुरू झाल्या माझ्या मुलाने मला धाड वरून दप्तर आणायचे सांगितले होते. परंतु मी दप्तर घेऊ शकलो नाही तर मी तक्रार कोणाकडे करू बियाणे तर मी तुमच्या दुकानातून घेतले तुम्ही म्हणता एक रुपया सुद्धा तुम्हाला देऊ शकत नाही. सदर शेतकऱ्याच्या डोळ्यात आसू अनावरण झाले मुलाने दप्तर सांगितले मी दप्तर घेतले नाही. माझ्याकडे पैसे शिल्लक नाही मी सोयाबीनचे बियाणे खरेदी केले आणि पेरणी केली.

मात्र बियाणे उगलेच नाही ही व्यथा येथील त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र चे संचालक गुळवे कोट्यावधी आहेत त्यांना ही व्यथा सांगून त्यांना थोडीही दयामया आली नाही. असे चार शेतकरी अक्षरशः दुकानापुढे केविलवाणी उभे होते. गजानन रामदास सावळे, कैलास रामदास सावळे, भरत उखर्डा सावळे,महेश गंगाधर निकम , ऋषिकेश लवंगे सर्व रा. मासरुळ सदर शेतकऱ्यांनी या त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्रातून दहा बॅग ६१२  महामंडळाचे बियाणे (Spurious soybean seeds) खरेदी केले. मात्र ते उगलेच नाही. धाड शहरातील त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र नामांकित दुकान आहे कित्येक वर्षापासून यांचा व्यवसाय आहे तरी यांनी या शेतकऱ्याबाबत थोडीही दया  माया दाखवली नाही. अशी अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन बियाण्याबाबत या दुकानातील बियाण्याबाबत फसवणुक झाली आहे. तरी जिल्हा कृषी अधिकारी यांनी या बोगस बियाण्याबाबत पाहणी करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी व सदर दुकानदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

सदर बियाणे उगले नाही त्याबाबत मी काहीही करू शकत नाही. त्याकरिता तुम्ही महामंडळ बियाणे अधिकारी यांच्याकडे तक्रार करा बियाणे उगले नाही हे मी समजू शकतो परंतु मी दुसरे बियाणे किंवा पैसे देऊ शकत नाही. 
-गुळवे, संचालक त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र धाड.