शेतकरी ओळखपत्र

कृषी विभागाच्या योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य

Farmer Identity Card: हिंगोलीमध्ये 14 नोव्हेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजना सुरू झाली असून, 15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य

कृषी विभागाच्या योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य

Farmer Identity Card

शेतकऱ्यांनी 20 मेपूर्वी नोंदणी पूर्ण करावी

हिंगोली (Farmer Identity Card) : राज्यात दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, दिनांक 15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकरी बांधव-भगिनींनी तात्काळ ओळखपत्राची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. राज्यात एकूण 1 कोटी 71 लाख खातेदार संख्या असून, त्यापैकी 1 कोटी 32 लाख शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढलेले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी विलंब न करता आपला तो तयार करून घ्यावा, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

या (Farmer Identity Card) नोंदणीसाठी शेतकरी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात. तसेच शेतकरी स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात. यापुढे कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध कृषी निविष्ठा जसे बियाणे, खते, औषधे आदी प्राप्त करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव-भगिनींनी 20 मेपूर्वी फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या (Farmer Identity Card) नोंदणीसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास विभागनिहाय हेल्पडेस्कशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी श्रीमती शीतल कौदरे (मो. 9172319637) यांच्याशी संपर्क साधावा. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026