Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > शेती

सावंगी जमिन प्रकरण

शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने देणार नाही...!

Sawangi Land case: नागपूर येथील सावंगी येथील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतमध्ये ठराव केला की, त्यांच्या जमिनी कवडीमोल दराने देणार नाहीत. शासनाने जमिनीचा मोबदला ४४ लाख रुपये एकर ठरविले.


शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने देणार नाही

Sawangi Land case |

सावंगी (असोला) येथील संतप्त शेतकऱ्यांचा ग्रामपंचायतमध्ये एकमुखाने ठराव 

नागपूर (Sawangi Land case) : बुटीबोरी येथिल अतिरिक्त औधोगिक क्षेत्राकरिता लागणारी जमीन शासन आता सावंगी (असोला) या परिसरात संपादित करणार असून शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला ४४ लाख रुपये एकर या दराने देणार असल्याचे जाहीर केले. परंतु शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या जमिनी अत्यंत कमी दराने मागत असल्याचा ठपका ठेवत सावंगी (असोला) येथील जवळपास ५०० ते ६०० शेतकऱ्यांनी आज सोमवार दि २७ एप्रिल ला ग्रामपंचायत सावंगी येथे विशेष ग्रामसभा घेत 'शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने देणार नाही' असा ठरव एकमुखाने पारित केला.

मिळालेल्या माहितीनुसार शासनाने बुटीबोरी येथील अतिरिक्त औधोगिक क्षेत्रकारिता सावंगी (असोला) या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी (Sawangi Land case) संपादित करण्यासाठी ४४ लाख रुपये प्रति एकर असा दर ठरविलेला आहे. परंतु ४४ लाख रुपये एकर हा दर सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी असून जमिनीची किमंत प्रती एकर १ करोड ४४ लाख असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून इतक्या कमी दरात शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्यास त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होईल. त्यामुळे शासन आमच्या जमिनी कवडीमोल दराने का मागत आहे असा संतप्त सवाल येथील भूमिपुत्रांनी उपस्थित केला.    

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या मागील ५ वर्षाच्या विक्रीपत्राचा नमुना दाखला देऊन शासकीय दराचा निषेध करीत विरोध दर्शवीला. 'जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची', 'भीक नको, हक्काचे मोल द्या' अशा प्रकारच्या घोषणा देत शेतकऱ्यांना भूमिहीन (Sawangi Land case) करणाऱ्या शासनाचा निषेध करीत जोपर्यंत शासन योग्य कार्यवाही करणार नाही, तोपर्यंत शेतकरी हार मानणार नाही असा कडक इशारा सुद्धा देण्यात आला.या विशेष ग्रामसभेला सरपंच शेषराव नागमोते, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह पंकज जैस्वाल, अशोक खडतकर, सुधीर नागमोते, राजेंद्र देशमुख, अतुल गोरले, अक्षय आडकीने, कोमल गहरुले, दिनेश कोहळे,शिवराम मेहुणे, रवी गोरले,मोहन ढोडरे, बंडू मुरले, कवडू सलाम, योगेश आडकीने, सुभाष आडकीने,भारत आवते, अनिल ठाकरे सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या मागण्या: 

१)भुसंपादणाचा दर बाजारभावाच्या चारपट देण्यात यावा 
२)भूसंपादीत शेतकऱ्यांना प्रस्तावित औधोगिक क्षेत्रामध्ये १५% वाणिज्य भूखंड उपलब्ध करून द्यावा 
३)सावंगी (असोला) हे क्षेत्र शासकीय सिंचन प्रकल्प कान्होलीबारा अंतर्गत येत असल्याने संपूर्ण क्षेत्राची नोंदणी ओलिताखाली करण्यात यावी.
४)भूसंपादीत शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीची हमी देण्यात यावी 
५)शेतात असलेल्या अचल मालमत्तेचा (विहीर, फळझाडे, फुलझाडे) आदीचे अचूक मूल्यांकन करण्यात यावे.

Related to this topic: