Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > शेती

हिंगोली भुईमुग आवक

हिंगोलीच्या मोंढ्यात भुईमुगाच्या शेंगाची आवक वाढल्याने शेंगा रस्त्यावर

Hingoli Groundnut Intake: हिंगोलीमध्ये भुईमुगाच्या शेंगाची मागणी वाढत असताना, ७ हजार ८०० रुपये/क्विंटलचा भाव नोंद झाला.


हिंगोलीच्या मोंढ्यात भुईमुगाच्या शेंगाची आवक वाढल्याने शेंगा रस्त्यावर

Hingoli Groundnut Intake |

 

भाव ७ हजार  ८०० रुपये,आवक १ हजार ४५० क्विंटल

हिंगोली (Hingoli Groundnut Intake) : येथील कृषी उत्पन्न बाजार  समितीच्या  संत नामदेव मार्वेâट  यार्डात १९ मे मंगळवार रोजी भुईमुगाच्या  शेंगाची आवकमोठ्या  प्रमाणावर झाल्याने  जागेअभावी शेतकर्‍यांना भुईमुगाचे पोते रस्त्यावर टाकण्याची  वेळ  आली होती. वाढत्या उन्हात शेंगाला राखत बसावे लागले.

मोंढ्यामध्ये १ हजार ४५० क्विंटल  शेंगा विक्रीसाठी आल्या होत्या. त्याला ७ हजार  ८००  रुपये क्विंटलचा भाव  मिळाला. येथील बाजार समितीच्या  संत नामदेव मार्केट यार्डात सध्या  हळद, सोयाबीन यासह आता भुईमुगाच्या शेंगाची आवक  सुरु झाली आहे. मंगळवारी मोंढ्यामध्ये (Hingoli Groundnut Intake) भुईमुगाच्या  शेंगा विक्रीसाठी आल्या होत्या.  जिल्ह्यात  इसापूर व सिध्देश्वर धरणाच्या  परिसरातून जाणार्‍या  कालव्याच्या  काठावर शेती असलेल्या  शेतकर्‍यांनी उन्हाळी  पिक म्हणून भुईमुगाची लागवड केली होती. सध्या शेंगाची काढणी सुरु झाली आहे. काढणी केल्यानंतर शेतकर्‍यांनी मोंढ्यामध्ये शेंगा विक्रीसाठी आणल्या आहेत.

जिल्हाभरात भुईमुगाची काढणी सुरु असल्याने  शेतकर्‍यांनी मंगळवारी  मोठ्या  प्रमाणावर शेंगा विक्रीसाठी आणल्या होत्या. प्रमाणापेक्षा आवक वाढल्याने जागेअभावी शेतकर्‍यांना भुईमुगाच्या  शेंगाचे पोते रस्त्यावर टाकण्याची वेळ  आली होती. शेडमध्ये अपुरी जागा  असल्याने शेतकर्‍यांना रस्त्यावर पोते टाकून उन्हामध्ये ताटकळत बसावे लागले. असे चित्र मोंढ्यामध्ये होते.

Related to this topic: