Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > शेती

शेतकऱ्याचे नुकसान

DP fire Burnt: डीपीला लागलेल्या आगीमुळे संत्रा बाग जळून खाक

वरुडातील शेतकऱ्याच्या संत्रा बागेत लागलेल्या आगीमुळे लाखोंचे नुकसान. शेतकरी रमेश महादेव भामकर यांच्या बागेतील झाडे जळून खाक.


dp fire burnt डीपीला लागलेल्या आगीमुळे संत्रा बाग जळून खाक

सावंगी शिवारातील घटना; महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

वरुड (DP fire Burnt) : तालुक्यातील पुसला जवळील सावंगी शेतशिवारात विद्युत डीपीला लागलेल्या आगीमुळे संत्र्याची बाग जळून खाक झाल्याची घटना ३ मार्च रोजी दुपारी घडली. या (DP fire Burnt) आगीत शेतकरी रमेश महादेव भामकर यांच्या संत्रा बागेसह इतर फळझाडांचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेस महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरुड येथील शेतकरी रमेश भामकर यांचे पुसला नजीक सावंगी शिवारात शेत असून त्यांनी तेथे संत्रा बाग विकसित केली आहे. बागेत ठिबक सिंचन, स्प्रिंकलर यांसारख्या सुविधा उपलब्ध असून संत्र्यांसोबतच पेरू, सीताफळ, आवळा व निंबूची झाडेही लावण्यात आली होती. ३ मार्च रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास शेताजवळील विद्युत डीपीला (DP fire Burnt) अचानक आग लागली. या आगीच्या ज्वाळा बागेत पसरल्याने संत्र्याची संपूर्ण बाग आगीच्या विळख्यात सापडली.

परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब येताच शेंदुर्जना घाट व वरुड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले; मात्र तोपर्यंत बागेतील अनेक संत्रा झाडांसह इतर फळझाडे जळून खाक झाली होती. यामुळे हाती येणारे संत्र्याचे पीकही नष्ट झाले आहे. यासोबतच लाखो रुपये किमतीचे ठिबक सिंचन, स्प्रिंकलर आणि तुरीचे कुटार देखील जळून खाक झाले आहे.

या घटनेमुळे रमेश भामकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे डीपीला आग लागून आपली बाग जळून गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या (DP fire Burnt) प्रकरणाची दखल घेऊन पंचनामा करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भामकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यापूर्वीही तीन वेळा लागली आग

याच डीपीमुळे यापूर्वीही रमेश भामकर यांच्या बागेला तीन वेळा आग लागल्याची घटना घडली आहे. २०१६, २०२३ आणि २०२५ मध्येही आगीमुळे बागेचे नुकसान झाले होते. २०२५ मधील घटनेनंतर पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या असतानाही अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप भामकर यांनी केला आहे.

जिवंत झाडांचा झाला कोळसा

मोठ्या कष्टाने रमेश भामकर यांनी आपल्या बागेत ७२५ संत्रा झाडांसह पेरू, आवळा, सीताफळ व निंबूची झाडे लावून बाग फुलविली होती. येत्या हंगामात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा असताना लागलेल्या आगीत जिवंत झाडांचा कोळसा झाला आणि हाती येणारे पीकही नष्ट झाले. त्यामुळे (DP fire Burnt) आपल्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून त्वरित नुकसानभरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भामकर यांनी दिला आहे.

 

Related to this topic: