Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > शेती

लातूर तावरजा प्रकल्प कालवे

अखेर वाहू लागले तावरजा प्रकल्पाचे कालवे; शेतकऱ्यांमध्ये समाधान

Latur Tawarja Project Canals: लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पाच्या कालव्यांना अखेर पाणी सोडले गेले. शेतकऱ्यांना समाधान मिळाले, तर त्यांना अधिक दाबाने पाणी देण्याची मागणी आहे


अखेर वाहू लागले तावरजा प्रकल्पाचे कालवे शेतकऱ्यांमध्ये समाधान

Latur Tawarja Project Canals |

 

अधिक दाबाने पाणी सोडण्याची मागणी

लातूर (Latur Tawarja Project Canals) : लातूर तालुक्यातील उटी खुर्द येथे असलेल्या तावरजा मध्यम प्रकल्पाच्या कालव्यांना अखेर पाणी सोडले असून सोमवारी हे पाणी आलमला शिवारात दाखल झाले. डाव्या कालव्याचे पाणी रविवारीच दाखल झाले होते. जलसंपदा विभागाच्या उशिराच्या का होईना या कामगिरीमुळे कालव्याखालील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या कालव्यांना तात्काळ पाणी सोडावे, यासाठी दैनिक 'देशोन्नती'ने वृत्त मालिका लावून पाठपुरावा तडीस नेला, याबद्दल देशोन्नतीचेही शेतकऱ्यांमधून कौतुक होत आहे. 

26 मे रोजीच्या अंकात दैनिक देशोन्नतीने 'पाणी सुटणार गडे'  (Latur Tawarja Project Canals) कालवा दुरुस्ती पूर्णत्वाकडे!' वृत्त मालिकेतील हे वृत्त दिले होते. त्यामुळे कालव्यांना पाणी सुटण्याची आशा वाढली होती. मुळातच हंगामी पाणी देण्यास विलंब झाला आणि त्यातही पुन्हा कमकुवत नादुरुस्तीमुळे यंदा उन्हाळी हंगामासाठी पाणी उशिरा सोडण्यात आले. एकीकडे केरळमध्ये मान्सून धडकला असताना दुसरीकडे या कालव्यांना पाणी सोडण्यात आले, यातून जलसंपदा विभागाचे तत्परता ठळकपणे लक्षात येते.

तावरजा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याखाली लातूर तालुक्यातील शिऊर, अंकोली, चिंचोलीराव, गंगापूर तर औसा तालुक्यातील आलमला, उंबडगा बु. व खु. या शिवारातील शेती येते. या भागातील कालव्याखालील शेतकऱ्यांना या (Latur Tawarja Project Canals) पाणी पाळीचा फायदा होणार असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कालव्यांना अधिक दाबाने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

Related to this topic: