भारत धान्य उत्पादन

भारताकडे सर्वाधिक लागवडीयोग्य जमीन...मात्र चीनचे धान्य उत्पादन दुप्पट

India Grain Production: ब्रिक्स देशांमध्ये भारताकडे सर्वाधिक सुमारे १५४ दशलक्ष हेक्टर लागवडीयोग्य जमीन असतानाही धान्य उत्पादकतेच्या बाबतीत भारत चीनच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे आकडेवारीतून समोर

भारताकडे सर्वाधिक लागवडीयोग्य जमीन...मात्र चीनचे धान्य उत्पादन दुप्पट

India Grain Production

 

सिंचन, तंत्रज्ञान आणि सुधारित वाणांमुळे चीन आघाडीवर

नवी दिल्ली (India Grain Production) : ब्रिक्स देशांमध्ये भारताकडे सर्वाधिक सुमारे १५४ दशलक्ष हेक्टर लागवडीयोग्य जमीन असतानाही धान्य उत्पादकतेच्या बाबतीत भारत चीनच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. ब्रिक्सच्या संयुक्त सांख्यिकी प्रकाशनानुसार, २०२५ मध्ये चीनने ६६०.२१ दशलक्ष टन धान्याचे उत्पादन घेतले, तर भारताचे धान्य उत्पादन ३२४.७९ दशलक्ष टन राहिले. त्यामुळे चीनचे धान्य उत्पादन भारताच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक ठरले आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २०२५-२६ च्या अंदाजानुसार, (India Grain Production) भारतात तांदळाची प्रतिहेक्टर उत्पादकता २,९१५ किलो, गव्हाची ३,५९१ किलो आणि मक्याची ३,८२४ किलो आहे. याउलट चीनमध्ये तांदळाची प्रतिहेक्टर उत्पादकता ७,२०५ किलो, गव्हाची ५,९४० किलो आणि मक्याची ६,७०० किलो आहे.

चीनमधील खात्रीशीर सिंचन व्यवस्था, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि सुधारित वाणांचा मोठ्या प्रमाणावर वापर यामुळे तेथील उत्पादकता अधिक असल्याचे माजी कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी सांगितले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लागवडीयोग्य जमीन असूनही (India Grain Production) भारताला उत्पादकतेच्या पातळीवर चीनशी स्पर्धा करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, भारतातील कृषी उत्पादकतेतही गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीत मक्याची उत्पादकता २७ टक्क्यांनी, तांदळाची ७ टक्क्यांनी, तर गव्हाची उत्पादकता ४ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, २०२५ मध्ये (India Grain Production) भारताच्या तृणधान्य उत्पादनात २.२ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रातील 29 लाख शेतकरी ‘फार्मर आयडी’विनाच! सरकारी सवलतींपासून वंचित राहण्याची भीती

महाराष्ट्रातील 29 लाख शेतकरी ‘फार्मर आयडी’विनाच! सरकारी सवलतींपासून वंचित राहण्याची भीती

Maharashtra Farmer ID: सुमारे 29 लाख शेतकरी अद्याप फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) पासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, अनुदान आणि सवलती

Nov 03, 2026
कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेच्या कामावर पोकलेन अंगावर पडून मजुराचा मृत्यू; उळूपमध्ये संतापाचा उद्रेक!

कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेच्या कामावर पोकलेन अंगावर पडून मजुराचा मृत्यू; उळूपमध्ये संतापाचा उद्रेक!

Irrigation Project Worker Death: कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत भूम तालुक्यातील उळूप येथे सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामादरम्यान पोकलेन अंगावर पडल्याने अशोक बाळासाहेब सानप मजुराचा मृत्यू...

Nov 02, 2026
इसापूर धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन सिंचन आवर्तने; पहिली पाणीपाळी 1 नोव्हेंबरपासून

इसापूर धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन सिंचन आवर्तने; पहिली पाणीपाळी 1 नोव्हेंबरपासून

Isapur Dam Irrigation: पिण्याच्या पाण्याचे आरक्षण आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून सन २०२६-२७ मध्ये रब्बी व उन्हाळी हंगाम

Oct 28, 2026
​इसापूर धरणाच्या शेनोडी-रामवाडी उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता द्या; हक्क संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा!

​इसापूर धरणाच्या शेनोडी-रामवाडी उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता द्या; हक्क संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा!

Isapur Dam Irrigation Project: इसापूर धरणाच्या जलाशयातील बहुप्रतिक्षित 'शेनोडी- रामवाडी उपसा जल सिंचन योजने'ला तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन या योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी

Oct 28, 2026
राज्यात 13,928 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 295 कुटुंबे अद्याप शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत!

राज्यात 13,928 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 295 कुटुंबे अद्याप शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत!

Maharashtra Farmer Suicides: महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव, कर्जाचा वाढता बोजा आणि अनिश्चित नैसर्गिक परिस्थिती

Oct 28, 2026