Project Affected Farmers,

मानोरा तालुक्यातील ४६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा २६ सप्टेंबरला जलसमाधी घेण्याचा इशारा!

मानोरा तालुक्यातील ४६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सानुग्रह अनुदानासाठी २६ सप्टेंबरला जलसमाधी घेण्याचा इशारा दिला असून मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले.

मानोरा तालुक्यातील ४६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा २६ सप्टेंबरला जलसमाधी घेण्याचा इशारा!

Project Affected Farmers,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; भीलडोंगर, हिवरा व शेगी संग्राहक प्रकल्पाचे अनुदान दोन वर्षांपासून रखडले

मानोरा : विदर्भातील जलसिंचन प्रकल्पांसाठी २००६ ते २०१३ या काळात अत्यंत कमी दरात सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने सानुग्रह अनुदान मंजूर केले असले तरी, मानोरा तालुक्यातील तीन गावांतील ४६ शेतकऱ्यांना आजपर्यंत एक रुपयाही मिळाला नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दि. २६ सप्टेंबर २०२६, शनिवार रोजी त्याच प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना (B.P.S.S.) महाराष्ट्रच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.

नियामक मंडळाच्या माध्यमातून ८५व्या बैठकीत विदर्भातील १६,६३३ हेक्टरसाठी एकूण अंदाजे ८३२ कोटी रुपये सानुग्रह अनुदान स्वरूपात सप्टेंबर २०२४ या वर्षात मंजूर करण्यात आले. या निधीच्या धनादेशाचे वितरण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथे दि. १६ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत अनेक प्रकल्पातील शेतकऱ्यांना निधी वाटप करण्यात आले आहे.

परंतु दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही मानोरा तालुक्यातील भीलडोंगर ल.पा. प्रकल्पातील ४४.३२ हेक्टरसाठी १५२.५५ लाख रुपये, हिवरा संग्राहक ल.पा. योजनेअंतर्गत १९.४५ हेक्टरसाठी ९७.२५ लाख रुपये आणि शेगी संग्राहक ल.पा. योजनेअंतर्गत १९.४८ हेक्टरसाठी ९९.२७ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. मात्र, आजपावेतो सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांना सदर निधी प्राप्त झाला नाही.

या संदर्भात वाशिम पाटबंधारे विभाग, वाशिम यांच्याकडे अनेक वेळा निवेदन देऊन वारंवार निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात विनंती करण्यात आली. परंतु आमच्या निवेदनाच्या अनुषंगाने संबंधित विभागाने व सरकारने कोणतीच दखल घेतली नाही. अखेर नाईलाजास्तव आमच्या जमिनी ज्या प्रकल्पात गेल्या, त्याच प्रकल्पात दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी जलसमाधी घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर संतोष चुनीलाल राठोड (बळीराजा संघर्ष समिती तालुका अध्यक्ष), अब्दुल समद अब्दुल वजीर, धूरपताबाई हनवंता सस्ते, रुपेश आकातराव उघडे, विनोद मेश्राम पवार व खालील सही करणारे ४६ प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी सह्या केल्या आहेत.

जलसमाधी घेण्याआधी आपण आमच्या सानुग्रह अनुदानाचा निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात तातडीने कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा. असे न झाल्यास आम्ही जलसमाधी घेण्याचा निर्णय कायम ठेवून आमचे जीवन संपवणार आहोत, याची सर्वस्वी जबाबदारी शासन/प्रशासनाची असेल, असा थेट इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

स्टेट बँक शाखा मानोराला कायमस्वरूपी क्षेत्र अधिकारी द्या! 

स्टेट बँक शाखा मानोराला कायमस्वरूपी क्षेत्र अधिकारी द्या! 

SBI Manora Branch: भारतीय स्टेट बँक शाखा मानोरा ही  तालुक्यातील सर्वात मोठी बँक शाखा असून, या शाखेला सुमारे ९० गावांतील शेतकरी, व्यापारी, खातेधारक जोडलेले आहेत. मात्र या शाखेला कायमस्वरूपी क्षेत्र...

Nov 13, 2026
दुष्काळात पाण्याची उधळपट्टी! चिरकुटा धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाणी शेतात, २८ गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

दुष्काळात पाण्याची उधळपट्टी! चिरकुटा धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाणी शेतात, २८ गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

मानोरा तालुक्यात चिरकुटा धरणाची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी शेतात; २८ गावांचा पाणीपुरवठा धोक्यात येण्याची भीती, ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी.

Nov 11, 2026
गोकुळ दूध संघ निवडणुकीत लोकशाहीची गळचेपी?

गोकुळ दूध संघ निवडणुकीत लोकशाहीची गळचेपी?

गोकुळ दूध संघातील नियुक्त सदस्यांच्या मतदानाच्या अधिकाराविरोधात मानोरा काँग्रेस आक्रमक; शासन निर्णय रद्द करून अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी.

Nov 09, 2026
मानोऱ्यात मनोज जरांगे पाटलांचे जंगी स्वागत; समाजबांधव आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

मानोऱ्यात मनोज जरांगे पाटलांचे जंगी स्वागत; समाजबांधव आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

मनोज जरांगे पाटील यांचे मानोरा शहरात आगमन होताच समाजबांधव आणि शेतकऱ्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Nov 09, 2026
गोकुळच्या ४ तज्ज्ञ संचालकांची नावे सतेज पाटलांनी फोडली; सांगलीतील व्यक्तीचाही समावेश!

गोकुळच्या ४ तज्ज्ञ संचालकांची नावे सतेज पाटलांनी फोडली; सांगलीतील व्यक्तीचाही समावेश!

गोकुळच्या चार तज्ज्ञ संचालकांची नावे सतेज पाटलांनी जाहीर केली. सांगलीतील व्यक्तीच्या नियुक्तीवरून महायुती सरकारवर जोरदार टीका.

Nov 09, 2026