विदर्भ शेतकरी मागणी

विदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांना निवेदन

Vidarbha Farmers' Demand: विदर्भातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजजी चव्हाण यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांना निवेदन

Vidarbha Farmers' Demand

शेतकरी विकास मंच व्दारे मा. तहसिलदार आणि कृषी अधिकारी पारशिवनी मार्फ निवेदन

कन्हान (Vidarbha Farmers' Demand) : विदर्भातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजजी चव्हाण यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात राज्यातील कर्जमाफीची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांना न मिळाल्याचा, धान बोनस प्रलंबित असल्याचा तसेच आग लागुन पिकांचे नुकसा न झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. 

निवेदनानुसार विदर्भात पावसाअभावी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असुन भात, तूर, कापु स आदी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्य ता निर्माण झाली आहे. याशिवाय कर्जमाफीची रक्कम बँकांपर्यंत न पोहोचल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यास अडचणी येत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच नागपुर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यात आग लागुन गहु पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना चार महिन्यांनंतरही आर्थिक मदत मिळा लेली नसल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

राज्य सरकारने पुन्हा १ रू. पीक विमा योजना सुरू करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, धान बोनस व (Vidarbha Farmers' Demand) कर्जमाफीची रक्कम तत्काळ वितरित करावी, अशी मागणी मा. सुरेश वाघचौरे तह सिलदार पारशिवनी आणि मा. राकेश वसु तालुका कृषी अधिकारी पारशिवनी यांच्या मार्फत निवेदन मा. शिवराजजी चव्हाण, कृषी मंत्री भारत सरकार, नवी दिल्ली हयाना पाठवुन शेतकरी विकास मंच व्दारे भगवानदास यादव, शांताराम जळते, राजु गुरधे, सुरेश मेश्राम, विशाधर कांबळे, गणेश कांबळे, बळीराम सातपैसे, रामकृष्ण हुड, प्रविण सतदेवे, निर्मला मरकाम, सुनीता कांबळे आदि सह शेतक-यांनी केली आहे.

संबंधित सामग्री

उभ्या पिकावर केळी पिकली; भाव कोसळले, उत्पादन खर्चही निघेना...

उभ्या पिकावर केळी पिकली; भाव कोसळले, उत्पादन खर्चही निघेना...

नांदेड जिल्ह्यात केळी पिकांवर अचानक पिवळावी परिस्थिती झाली आहे, ज्या कारणामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च करताना तणताना दिसून आले आहे.

Sep 05, 2026
मानोरा तालुका मूलभूत सुविधांपासून वंचित; शिक्षण, आरोग्य, सिंचन, उद्योगाअभावी तरुणांचे स्थलांतर

मानोरा तालुका मूलभूत सुविधांपासून वंचित; शिक्षण, आरोग्य, सिंचन, उद्योगाअभावी तरुणांचे स्थलांतर

Manora Taluka Development: आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित झालेल्या वाशिम जिल्ह्यातील अती मागास असलेला मानोरा तालुका आजही शिक्षण, आरोग्य, दळणवळण आणि सिंचनासारख्या मूलभूत सुविधांपासून कोसो दूर

Aug 09, 2026
परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

Parbhani Urea Black Marketing: युरिया खताची मागणी जास्त असल्याचा गैरफायदा घेत होलसेल व्यापारी लहान विक्रेत्यांना व शेतकर्‍यांना युरियासोबत इतर महागडी खते घेण्याची सक्ती करत आहेत.

Aug 07, 2026
कर्जाचा डोंगर, नापिकीचा घाव...अखेर बाप-लेकाचा जीवनप्रवास संपला!

कर्जाचा डोंगर, नापिकीचा घाव...अखेर बाप-लेकाचा जीवनप्रवास संपला!

Farmer father-Son Suicide: सततची नापिकी, वाढता कर्जाचा बोजा आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावाने त्रस्त झालेल्या शेतकरी पिता-पुत्राने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना

Jul 20, 2026
जुलै महिना संपत आला तरी पावसाची प्रतीक्षा; पाझर तलाव अजूनही कोरडे, शेतकरी चिंतेत

जुलै महिना संपत आला तरी पावसाची प्रतीक्षा; पाझर तलाव अजूनही कोरडे, शेतकरी चिंतेत

Pazar Lake Dry: पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी लांबणीवर टाकली आहे.

Jul 15, 2026