Pazar Lake Dry: पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी लांबणीवर टाकली आहे.
वन्य प्राण्यांसह जनावरांची पाणी पिण्यासाठी भटकंती
पानकनेरंगाव (Pazar Lake Dry) : जुलै महिना अर्धा झाला तरी परिसरात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक पाझर तलाव अजूनही कोरडे ठाक पडले असून पाण्याची पातळी अत्यंत कमी होत चालली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी लांबणीवर टाकली आहे.
काही ठिकाणी झालेली पेरणीही पुरेशा पावसाअभावी संकटात सापडली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून बसले असून लवकरच मुसळधार पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया: दिलीप विश्वनाथ आरे शेतकरी
परिसरातील पाझर तलावांमध्ये पाणीसाठा (Pazar Lake Dry) नसल्याने जनावरे आणि वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे बहुतांश तलाव कोरडेठाक पडले असून पाण्याअभावी जनावरे आणि वन्यप्राणी भटकंती करताना दिसत आहेत. लवकरच समाधानकारक पाऊस पडून तलाव पुन्हा भरावेत आणि जनावरे तसेच वन्यप्राण्यांची पाण्याची समस्या दूर व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व शेतकरी व्यक्त करत आहेत.
प्रतिक्रिया: माणीक पल्हाद आरघडे शेतकरी
सेनगाव तालुक्यातील खैरखेडा,महाळशी, शिंदेवाडी,सावरखेडा सूलदली,पानकनेरगासह आदी गावात जोरदार पाऊस न झाल्यामुळे परिसरातील ओढ्या नाल्यांवरील बंधारे व पाझर तलाव कोरडे ठाक आहेत. पेरणी केलेले सोयाबीन पिकाची उगवण झाली नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट काही शेतकऱ्यांवर आले आहे.
प्रतिक्रिया: गजानन शंकर पूरी शेतकरी
जुलै महिना अर्धा संपत गेला असला तरी पानकनेरगाव परिसरात अद्याप ओढ्यांना पाणी आले नाही. परिणामत राष्ट्रीय महामार्ग ते खैरखेडा रस्त्यालगत असलेला बेलदरी पाझर तलाव अजूनही कोरडाठाक आहे. तसेच या तलावाच्या बाजूलाच गावाला (Pazar Lake Dry) पाणी पुरवठा करणारी जलजीवन मिशनची विहीर सुद्धा आहे. या विहिरीच्या भरोशावर गावाची तहान भागवली जाते सदर पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास नजीकच्या काळात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल, अशी परिस्थिती आहे