Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > शेती

परभणी युरिया काळाबाजार

परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

Parbhani Urea Black Marketing: युरिया खताची मागणी जास्त असल्याचा गैरफायदा घेत होलसेल व्यापारी लहान विक्रेत्यांना व शेतकर्‍यांना युरियासोबत इतर महागडी खते घेण्याची सक्ती करत आहेत.


परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’ होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती

Parbhani Urea Black Marketing |

 

कृषी अधिकार्‍यांचे अर्थपूर्ण मौन शेतकर्‍यांतून तीव्र संताप

परभणी (Parbhani Urea Black Marketing) : जिल्ह्यात एकीकडे पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी शेतातील कामांना आणि खत खरेदीला प्राधान्य देत आहेत. मात्र, ऐन गरजेच्या वेळी परभणीतील खतांचे होलसेल व्यापारी आणि डीलर्सकडून युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असून, इतर महागड्या खतांची 'लिंकिंग' केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. युरिया खताची मागणी जास्त असल्याचा गैरफायदा घेत होलसेल व्यापारी लहान विक्रेत्यांना व शेतकर्‍यांना युरियासोबत इतर महागडी खते घेण्याची सक्ती करत आहेत.

काही व्यापार्‍यांना २० टन युरियामागे ५ टन अमोनियम सल्फेट दिले जात आहे, तर काहींना अवघ्या १० टन युरियासाठी ५ टन अमोनियम सल्फेट माथी मारले जात आहे. युरियाची एक लॉट गाडी (उदा. १० टन) सुमारे ५७ हजार रुपयांना पडते, परंतु त्यासोबत दिला जाणारा ५ टन अमोनियम सल्फेट तब्बल १ लाख ४५ हजार रुपयांना घ्यावा लागत आहे. मागच्या वर्षी ८५० रुपयांना मिळणारे अमोनियम सल्फेट खत यंदा १ हजार ४५० रुपयांपर्यंत महागले आहे. 

योग्य भावात आणि वेळेवर युरिया न मिळाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन लिंकिंगची सक्ती करणार्‍या व्यापार्‍यांवर आणि भ्रष्ट अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

कृषी अधिकार्‍यांचे हप्तेबाजीमुळे दुर्लक्ष
या सर्व प्रकारावर कृषी विभागाचे  पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. तक्रारी करूनही अधिकारी कारवाई करत नाहीत. (Parbhani Urea Black Marketing) काही व्यापार्‍यांकडून विना लिंकिंग युरिया  देण्यासाठी प्रति बॅग मागे तब्बल १०० रुपयांचा हप्ता गोळा केला जात असल्याचे गंभीर आरोपही व्यापारी वर्गातून होऊ लागले आहेत. अधिकारी आणि बड्या व्यापार्‍यांच्या या संगनमतामुळे सामान्य शेतकरी व प्रामाणिक विक्रेते भरडले जात आहेत.

नगदी व्यवहार तरीही अडवणूक
लहान विक्रेते पूर्ण रक्कम रोखीने भरण्यास तयार असतानाही, लिंकिंगचे हे खत न घेतल्यास युरियाचा मालच दिला जात नाही. यामुळे विक्रेत्यांचे लाखो रुपये अडकून पडत असून याचा थेट फटका शेतकर्‍यांना बसत असल्याची माहिती परभणीतील एका खत विक्री व्यापार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.

Related to this topic: