Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > शेती

बोगस बियाणे विरोध

बोगस बियाणे विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

Bogus seeds Protest: हिंगोली जिल्ह्यातील क्रांतिकारी शेतकर्यांच्या संघटनाने अदृष्टपणे बोगस बियाणांची विक्री आणि कृषकांना लुटण्याच्या आरोपांवर प्रतिवाद करून कार्यालयाच्या परिसरात नोटा वितरण


बोगस बियाणे विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

Bogus seeds Protest |

 

कृषि अधिक्षक कार्यालय परिसरात उधळल्या नोटा

हिंगोली (Bogus seeds Protest) : जिल्ह्यात सर्रास बोगस बियाणांची विक्री सुरू असुन कृषि विभाग डोळेझाक करीत आहे, असा आरोप करून कारवाईसाठी पैसे लागत असतील तर ‘ह्या घ्या नोटा’ असे सांगुन संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कृषि कार्यालय परिसरात नोटा उधळल्या.

उगवणीच्या काळात ‘पेरले पण उगवलेच नाही’ अशी जिल्ह्यात अनेक शेतकर्‍यांची अवस्था झाली आहे. या विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला आहे.  प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलकांनी कार्यालयासमोर प्रतीकात्मक स्वरूपात पैसे फेकून तीव्र संताप व्यक्त केला. 'जर कारवाई करण्यासाठी पैसेच लागत असतील तर आम्ही पैसे द्यायलाही तयार आहोत. मात्र शेतकर्‍यांना लुटणार्‍या बोगस बियाणे व बोगस जैविक कीटकनाशक विक्रेत्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा' अशी भूमिका संघटने मांडली. शेतकर्‍यांची उघडपणे लूट होत असताना कृषी विभाग गप्प का असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

बोगस कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास शेतकर्‍यांच्या न्यायासाठी मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार आणि कृषी प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला. शेतकरी लुटणार्‍यांना पाठीशी घालणार्‍यांना आता जाब द्यावाच लागेल हा लढा सुरू आहे आणि सुरूच राहणार असल्याचे संघटनेने सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, तालुका अध्यक्ष प्रवीण मते, चैतन्य चव्हाण, रमेश जाधव, प्रवीण घुमणार, विशाल पौळ यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: