हूडूकदूमा विज कहर

हूडूकदूमा येथे विजेचा कहर; झाडाखाली उभ्या तीन जनावरांचा मृत्यू, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Hudukdooma lightning Death: कोरचीपासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या हूडूकदूमा येथे 26 जून रोजी सायंकाळी सुमारे 3 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात दुर्दैवी घटना घडली.

हूडूकदूमा येथे विजेचा कहर; झाडाखाली उभ्या तीन जनावरांचा मृत्यू, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Hudukdooma lightning Death

कोरची (Hudukdooma lightning Death) : कोरचीपासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या हूडूकदूमा येथे 26 जून रोजी सायंकाळी सुमारे 3 वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात दुर्दैवी घटना घडली. मोहफुलाच्या झाडावर वीज कोसळून झाडाखाली उभ्या असलेल्या तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत दिनेश जबेलसिंग काटेंगे (रा. हूडूकदूमा) यांची एक जनावर (गोरी) तसेच संतराम धनिराम जाता (रा. हूडूकदूमा) यांची दोन जनावरे (गाय व गोरा) दगावली. या अचानक झालेल्या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने काढलेल्या अंदाजे किंमत गाय 40 हजार रुपये व दोन वासरांची किंमत 20  हजार रुपये नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच बोरी येथील प्रभारी ग्राम महसूल अधिकारी रोहीनी कोटनाके,पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रभान लटाये, सरपंच सावची बोगा, उपसरपंच मीरा काटेंगे तसेच पोलीस पाटील गेंदलाल कमरो यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेमुळे  शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

वाढत्या तापमानामुळे गायीचा मृत्यू; प्राणी मित्रांनी केले गाईवर अंत्यसंस्कार

वाढत्या तापमानामुळे गायीचा मृत्यू; प्राणी मित्रांनी केले गाईवर अंत्यसंस्कार

Hingoli Cow Deaths: हिंगोलीच्या गंगानगर येथे तापमानामुळे गाईच्या मृत्यूची दुःखद घटना घडली. समावेशी प्राणी मित्रांनी सांस्कृतिक अंतिम संस्कार केले आणि जनावरांचा पाणी, सावल्याची व्यवस्था

Jun 11, 2026
वीज पडून बैल दगावला; पेरणी थांबू नये, म्हणून पत्नीला जुंपले औताला!

वीज पडून बैल दगावला; पेरणी थांबू नये, म्हणून पत्नीला जुंपले औताला!

Farmer Bull Death: बोंबळी येथे शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्या बैलावर वीज कोसळल्यानंतर मृत्यू झाला. शेती कामे थांबू नयेत म्हणून त्यांनी पत्नीला औताला जुंपले. समाजात मदतीची मागणी होत आहे.

Jun 09, 2026
रिसोड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन

रिसोड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन

Risod Bazar Samiti: रिसोडच्या स्थानिक कृषी बाजार समितीने २२ मेपासून कामकाज बंद केले होते, परंत्ये शेतकऱ्यांची आर्थिक हानि कमीत कमी करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत

May 27, 2026
विषारी औषध टाकल्याने तिन जनावरे मरण पावली; शेतकऱ्यांच मोठे नुकसान

विषारी औषध टाकल्याने तिन जनावरे मरण पावली; शेतकऱ्यांच मोठे नुकसान

Poisonous Drug Death: आखाडा बाळापूरमधील शेतकऱ्यांचा शेडमध्ये बांधलेले तीन पशुधन विषारी औषधामुळे मरण पावले. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रूपयांचे नुकसान झाले. पोलीस तपास करत आहे.

May 13, 2026