आखाडा बाळापूर (Poisonous Drug Death) : येथील शेतशिवारातील आखाड्यावरील शेडमध्ये नेहमीप्रमाणे बांधून ठेवलेल्या जनावरांना कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने किंवा इतर कारणांमुळे तीन जनावरे मरण पावली यामुळे शेतकऱ्यांचे एक ते सव्वा लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञात आरोपीविरुद्ध आज सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूरात गावा लगत राम विनायक बोंढारे यांचे शेत व शेतातील शेडमध्ये नेहमीप्रमाणे त्यांनी जनावरे बांधली होती. यात बांधून ठेवलेल्या म्हशीच्या तिन वघारू यांना 10मे रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी औषध (Poisonous Drug Death) टाकल्याने किंवा इतर कोणत्यातरी कारणांमुळे तिन्ही वघारू मरुन शेतकऱ्यांच लाख ते सव्वा लाख रूपयाच नुकसान झाले आहे. याबाबत राम बोंढारे फीर्यादीवरून अज्ञात आरोपी विरूद्ध आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येउन पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे मार्गदर्शनखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.
सदर प्रकार अत्यंत गंभीर असुन शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या पशुधनाचा असा अचानक अंत होउन शेतकऱ्याच मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी याबाबत तातडीने तपास करून प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी केली जाते.