हिंगोली कृषी केंद्र

हिंगोली जिल्ह्यात ७५० कृषी सेवा केंद्रे सलग दुसर्‍या दिवशीही बंद

Hingoli krushi Kendra: हिंगोली जिल्ह्यात ७५० कृषी सेवा केंद्रे दुसर्‍या दिवशीही बंद राहिली. मागण्यांच्या प्रलंबिततेमुळे विक्रेत्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे, अवैध बियाणे व खत विक्रीवर विरोध.

हिंगोली जिल्ह्यात ७५० कृषी सेवा केंद्रे सलग दुसर्‍या दिवशीही बंद

Hingoli krushi Kendra

 

प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन, लिंकिंग' सह अटींना विरोध

हिंगोली (Hingoli krushi Kendra) : राज्यासह जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ राज्य कृषी विक्रेते संघटनेने (माफदा) पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात हिंगोली जिल्हा सामील झाला आहे. सोमवार पासून सर्व कृषी सेवा केंद्रे  बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून,दुसर्‍या दिवशी २८ एप्रिल मंगळवार रोजी जिल्ह्यातील ७५० कृषी केंद्र बंद होती.

गेल्या चार-पाच वर्षांपासून खत कंपन्यांकडून होणारे लिंकिंग, अवैध बियाण्यांची विक्री आणि प्रशासनाचे जाचक नियम यांबाबत माफदा सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र, कृषी विभागाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने अखेर टोकाचे पाऊल उचलण्यात आले आहे. धुळे जिल्हा सीड्स, पेस्टीसाईड्स, फर्टिलायझर डीलर्स वेलफेअर असोसिएशनने या बंदला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

लिंकिंगमुळे शेतकर्‍यांना नको असलेली उत्पादने घ्यावी लागतात, तसेच अवैध बियाण्यांमुळे त्यांचे नुकसान होते. हा बंद केवळ विक्रेत्यांसाठी नसून शेतकर्‍यांच्या हितासाठीही आहे. शासनाने लेखी निर्णय घेतल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही, असे माफदा'च्या जिल्हा पदाधिकार्‍यांनी सांगितले. मे महिना जवळ येत असल्याने शेतकरी खते आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी सज्ज होत आहेत. अशा वेळी जिल्ह्यातील शेकडो (Hingoli krushi Kendra) कृषी सेवा केंद्रे बंद राहिल्यास निविष्ठांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026