हिंगोली हळद लिलाव

हिंगोली कृउबासमध्ये हळदीच्या लिलावावरून शेतकरी आक्रमक

Hingoli Turmeric Auction: हिंगोली कृउबासमध्ये हळदीचा लिलाव कमी दराने झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.

हिंगोली कृउबासमध्ये हळदीच्या लिलावावरून शेतकरी आक्रमक

Hingoli Turmeric Auction

हिंगोली (Hingoli Turmeric Auction) : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये १२ हजार रुपयापासून हळदीचा लिलाव केला जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. या प्रकरणी संतप्त शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. (Hingoli Turmeric Auction) हिंगोली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळदीला चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यासह पर जिल्ह्यातून आणि विदर्भातून अनेक शेतकरी हळद विक्रीला आणत आहेत.

२० एप्रिल रोजी जवळपास ३०० वाहनातून हळद विक्रीस (Hingoli Turmeric Auction) आणली होती. वाहनांची रांग आरामशीन पर्यंत लागली होती. हळदीच्या लिलाव पध्दतीवरून काही शेतकर्‍यांनी आक्षेप घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. हळदीचा शासकीय दर १६९०० असताना १२  हजारापासून लिलाव केला जात आहे. हळद विक्रीसाठी बाजार समितीत ६ ते ७ दिवस लागत आहेत. त्यामुळे १ हजाराचा वाहन खर्च शेतकर्‍यांच्या माथी लागत असल्याने शेतकर्‍यांना न्याय द्यावा यासाठी निवेदन देण्यात आले.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026