Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > शेती

हिंगोली मुसळधार पाऊस

मृग नक्षत्राच्या दुसर्‍या दिवशी जिल्ह्यात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस

Hingoli Heavy rain:


मृग नक्षत्राच्या दुसर्‍या दिवशी जिल्ह्यात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस

Hingoli Heavy rain |

 

पेरणीसाठी शेतकर्‍यांनी घाई करू नये - कृषि विभागाचे आवाहन

हिंगोली (Hingoli Heavy rain) : मृग नक्षत्राच्या दुसर्‍या दिवशी सोमवार, ८ तारखेला हिंगोली जिल्ह्यावर वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि कळमनुरी तालुक्यात विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. पाठोपाठ वसमत, औंढा नागनाथ आणि हिंगोली तालुक्यालाही पावसाने झोडपले.  काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस झाल्याची माहितीही मिळाली.

वादळी वार्‍याचा जोर इतका होता की ग्रामीण भागातील अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेली. पाऊस थांबताच गावकर्‍यांची उडालेली पत्रे गोळा करण्यासाठी एकच धावपळ उडाली. काही ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले, तर वीजपुरवठाही दीड तासासाठी ठप्प झाला होता. सायंकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असला तरी शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून मृगाच्या पहिल्या (Hingoli Heavy rain) पावसाची वाट पाहणार्‍या शेतकर्‍यांना हा पाऊस दिलासा देऊ शकला नाही. झालेला पाऊस पेरणीसाठी अपुरा असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. कृषी विभागाने शेतकर्‍यांना विशेष आवाहन केले आहे की, किमान १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. तसेच घाईगडबडीत बियाणे जास्त खोलवर पेरले जाणार नाही याची काळजी घ्यावी.

 मात्र पावसाच्या (Hingoli Heavy rain) या पहिल्या सरीनंतर शेतकर्‍यांची बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली असून, मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मोठा पाऊस झाल्यानंतरच जिल्ह्यात खर्‍या अर्थाने पेरणीच्या कामांना वेग येईल, असे चित्र सध्या दिसत आहे.

हिंगोली संत नामदेव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात भिजली हळद

मृग नक्षत्राच्या दुसर्‍याच दिवशी सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस कोसळला. हिंगोली कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या म्हणावी तशी हळद विक्रीला येत नसली तरी काही प्रमाणात वाहनातून हळद विक्रीला आणली होती. झालेल्या (Hingoli Heavy rain) मुसळधार पावसात कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट मध्ये व्यापार्‍यांची ठेवलेली पोत्यातील आणि शेतकर्‍यांनी विक्रीस आणलेली हळद या पावसामुळे चांगलीच भिजली. हळद भिजल्यामुळे शेतकर्‍यांची पळापळ झाली होती. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये पावसापासून बचाव करण्यात येणारी व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Related to this topic: