शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे राज्यपालांना निवेदन

Farmers'' Loan Waiver Andolan: महाराष्ट्रातील शेतकर्यांचा आर्थिक दबाव खूप वाढला असल्यासारखे नोंदवले गेले आहे. युवासेनाने रायज्यपालाला कर्जमुक्ती योजनेच्या तटस्थतेचा मागणा केला आहे.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे राज्यपालांना निवेदन

Farmers' Loan Waiver Andolan

चिखली (Farmers' Loan Waiver Andolan) : महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत नवीन निकष लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन (Farmers' Loan Waiver Andolan) करण्यात आले. 

यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख नंदु कराडे शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे उपजिल्हाप्रमुख विलास सुरडकर तालुकाप्रमुख किसनराव धोंडगे युवा सेना शहरप्रमुख आनंद गैची यांच्या सह शिवसैनिक उपस्थिती होते. यावेळी तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल. विष्णूदेव वर्मा यांना निवेदन देण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आंदोलनाचे (Farmers' Loan Waiver Andolan) आयोजन करण्यात होते.

तहसीलदारांमार्फत राज्यपालाला दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत असून शेतीमालाला योग्य भाव, वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने सहा महिन्यांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासाठी नवीन निकष लावले जात असल्याने अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात.

यामुळे राज्यपालांनी या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष घालून शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवसाहेब ठाकरे यांनी मांडलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या धर्तीवर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमुक्ती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६: सुधारित निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६: सुधारित निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Farm Loan Waiver Yojana: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा झाली आहे. या नय्या निर्णयानुसार, जे शेतकरी करज खात्यातून ५०,००० रुपर्यंत वसूल

Jul 12, 2026
खा. संजय दिना पाटील यांच्या पोस्टरला उबाठा शिवसेनेकडून 'जोडे मारो' आंदोलन

खा. संजय दिना पाटील यांच्या पोस्टरला उबाठा शिवसेनेकडून 'जोडे मारो' आंदोलन

MP Sanjay Dina Patil: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला.

Jun 25, 2026
खासदार नागेश आष्टिकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सेनगावात दहन

खासदार नागेश आष्टिकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सेनगावात दहन

MP Nagesh Patil Ashtikar: खासदार नागेश आष्टिकर यांचा पुतळ्याचे दहन करणाऱ्या कार्यकर्त्यांना विरोध करून शिवसेनेतील अनेक सदस्यांनी कडक प्रतिपादन केले. सेनगावातील शांतपणा उलटला.

Jun 18, 2026
मलकापुरात 'विकास' की 'गणिताचा' खेळ? कोट्यवधींच्या निधीवरून राजकारण तापले; विरोधक आक्रमक, सत्ताधारी 'बॅकफूट'वर!

मलकापुरात 'विकास' की 'गणिताचा' खेळ? कोट्यवधींच्या निधीवरून राजकारण तापले; विरोधक आक्रमक, सत्ताधारी 'बॅकफूट'वर!

मलकापूर नगरपालिकेची निवडणूक संपली असली तरी त्या निवडणुकीची ‘पडघम’ आणि ‘चर्चा’ मात्र संपायला तयार नाही.

Jun 15, 2026
हॉटेल, चहा टपरी धारक, धाबे वाल्यांना कमर्शियल सिलेंडर व केरोसीन तात्काळ उपलब्ध करून देण्याची शिवसेना (उबाठा) ची उपविभागी

हॉटेल, चहा टपरी धारक, धाबे वाल्यांना कमर्शियल सिलेंडर व केरोसीन तात्काळ उपलब्ध करून देण्याची शिवसेना (उबाठा) ची उपविभागी

मलकापूर व नांदुरा तालुक्यात सिलेंडरची भीषण टंचाई निर्माण झाली असून घरगुती तसेच कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्याने मलकापूर,नांदुरा तालुक्यात गॅस धारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Apr 16, 2026