Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > शेती

शेतकरी गळफास आत्महत्या

कर्जामुळे कोथळज येथील तरूण शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

Farmer Hanging Suicide: हिंगोलीच्या कोथळज गावात ३२ वर्षीय मयुर शिवाजी घुगे याने कर्ज आणि पिकाचे अडचणीमुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बांधलेल्या गायाचा गळफास केला


कर्जामुळे कोथळज येथील तरूण शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

Farmer Hanging Suicide |

हिंगोली (Farmer Hanging Suicide) : तालुक्यातील कोथळज येथील ३२ वर्षीय तरूण शेतकर्‍यावर बँक व ट्रॅक्टरचे कर्ज असल्याने तसेच मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने हे कर्ज कसे फेडावे या चिंतेतून गुरूवारी कोथळज शिवारातील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील कोथळज येथील मयुर शिवाजी घुगे (३२) या तरूण शेतकर्‍याकडे ५ एकर शेती असुन त्यावरच त्याच्या कुटूंबीयाची उपजिविका भागविली जात होती. शेतीकरीता त्याने बँकेचे कर्ज तसेच ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतले होते. मध्यंतरी नापिकी व सध्या पेरणी केल्यानंतर पावसाने मारलेली दडी यामुळे मयुर हे चिंतेमध्ये होते. पिक समाधानकारक न झाल्यास कर्ज कुठुन फेडावे या चिंतेमध्ये १६ जुलै गुरूवार रोजी दुपारी ३ ते ४ दरम्यान शेतामध्ये जाऊन सोबत असलेल्या देवना गिते यांना गाय बांधण्याकरीता पाठवून गळफास घेतला.

काही वेळात गिते आल्यानंतर त्यांना मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याने तात्काळ घरच्यांना माहिती दिल्यावर सर्वच जण घटनास्थळी आले. मृतदेह जिल्हा शवविच्छेदनाकरीता जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आला.  १७ जुलै रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाली आहे. मयत मयुर घुगे यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Related to this topic: