Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > शेती

शेतकरी आमरण उपोषण

न्यायासाठी वृद्ध शेतकऱ्यांचे शेतातच आमरण उपोषणाला सुरुवात

Farmer Hunger Strike: तालुक्यातील पोहरादेवी येथील वृध्द शेतकरी विमल सुखदेव चव्हाण आणि सुखदेव शामराव चव्हाण यांनी शेतजमिनीची नोंद घेऊन गैरअर्जदार शरद गणपत राठोड व मोरसिंग देवीसिंग राठोड


न्यायासाठी वृद्ध शेतकऱ्यांचे शेतातच आमरण उपोषणाला सुरुवात

Farmer Hunger Strike |

 

शेतजमिनीची नोंद घेऊन, सावकारी गुन्हा दाखल करावा!

मानोरा (Farmer Hunger Strike) : तालुक्यातील पोहरादेवी येथील वृध्द शेतकरी विमल सुखदेव चव्हाण आणि सुखदेव शामराव चव्हाण यांनी शेतजमिनीची नोंद घेऊन गैरअर्जदार शरद गणपत राठोड व मोरसिंग देवीसिंग राठोड यांच्यावर सावकारी गुन्हा दाखल करून न्याय द्यावा, या (Farmer Hunger Strike) मागणीसाठी दि. १० जून पासून शेतातच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पोहरादेवी येथील गट नंबर ६२ मध्ये पोहरादेवी शिवारात १ हेक्टर २१ आर आमची शेतजमीन आहे. ३ - ४ वर्षापूर्वी सदरील शेत जमीन ही शरद गणपत राठोड यांच्याकडे ३ लक्ष रुपये उसनवार घेऊन गहाण खरेदी खत करून दिले होते. उसनवार घेतलेली रक्कम थोडी थोडी करून परत दिले. परंतु त्याने शेत जमिनीचे खरेदी खत परत करून दिले नाही. याबाबत गावातील पंच मंडळींनी तोडगा काढला असता तरीही जमीन खरेदी खत करून देण्यास नकार देत आहे.

सदरील उसनवारीचा व्यवहार हा साक्षीदार संजय देविदास राठोड व संजय शेषराव जाधव यांच्या समक्ष झालेला आहे. (Farmer Hunger Strike) शेतीची नोंद घेण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार विनंती केली असता नोंद घेतली जात नाही. त्यामुळे वरील गैरअर्जदार यांच्याविरुद्ध सावकारी गुन्हा दाखल करून न्याय द्यावा, या मागणीसाठी वृद्धांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.