Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > शेती

परभणी शेतकरी आंदोलन

परभणीत गोदाकाठ कारखान्यासमोर शेतकर्‍यांचे आंदोलन

Parbhani Farmers Andolan: पाथरी तालुक्यातील थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावरून गोदाकाठ ऑरगॅनिक साखर कारखान्यासमोर आत्मदहनाचा इशारा दिलेल्या  ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सोमवार  १ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १


परभणीत गोदाकाठ कारखान्यासमोर शेतकर्‍यांचे आंदोलन 

Parbhani Farmers Andolan |

लेखी आश्वासनानंतर  १० जूनपर्यंत मुदत पोलीस व महसुल प्रशासनाची मध्यस्थी

परभणी (Parbhani Farmers Andolan) : पाथरी तालुक्यातील थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावरून गोदाकाठ ऑरगॅनिक साखर कारखान्यासमोर आत्मदहनाचा इशारा दिलेल्या  ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सोमवार  १ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १ वा.दरम्यान  कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देत आंदोलक शेतकर्‍यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.कासापुरी सर्कलसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी मागील गाळप हंगामात कारखान्यास ऊस पुरवठा केला होता.

मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यातील गाळपाचे ऊस बिल अद्यापही मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याच (Parbhani Farmers Andolan) पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी यापूर्वी प्रशासनाकडे निवेदन देऊन थकीत रक्कम तत्काळ अदा न झाल्यास कारखान्याच्या गेटसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशार्‍यानंतर सोमवारी ऊस उत्पादक शेतकरी कारखाना परिसरात एकत्र आले होते. आंदोलनाची माहिती मिळताच महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोनि. लक्ष्मण केंद्रे यांनी  मध्यस्थी करत आंदोलक शेतकरी व कारखाना प्रशासन यांच्यात चर्चा घडवून आणली.

चर्चेदरम्यान कारखाना प्रशासनाने शेतकर्‍यांची थकीत देयके अदा करण्यासाठी येत्या १० जूनपर्यंत मुदत देण्यात यावी अशी लेखी विनंती शेतकर्‍यांना  केली. तसेच गाळपासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकर्‍यांचे व तोड वाहतूकदारांचे थकीत बिल अदा करण्याची हमी म्हणून पाच कोटी रुपयांचा धनादेश अनामत स्वरूपात शेतकर्‍यांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.कारखाना प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर व प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे शेतकर्‍यांनी सद्यस्थितीत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. (Parbhani Farmers Andolan) आगामी खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकर्‍यांना शेतीच्या विविध कामांसाठी पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे थकीत ऊस बिले वेळेत मिळावीत अशी मागणी आंदोलक शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा प्रशासनासमोर मांडली.