Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > शेती

चिखली बोगस बियाणे

चिखली तालुक्यात बोगस बियाणाचे संकट; उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

Chikhli Spurious Seeds: यंदा पावसाळी पेरणीच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांच्या हाताला बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाणामुळे चटका, बाजारातून खरेदी केलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर संकट


चिखली तालुक्यात बोगस बियाणाचे संकट उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

Chikhli Spurious Seeds |

 

विनायक सरनाईक यांची कारवाईची मागणी

चिखली (Chikhli Spurious Seeds) : चिखली तालुक्यात यंदा पावसाळी पेरणीच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांच्या हाताला बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाणामुळे चटका बसला आहे. बाजारातून खरेदी केलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या प्रकरणी दोषी कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे,या कंपन्यांची माहिती शासनाला कळविण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केली आहे.

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध कृषी केंद्रातून सोयाबीनच्या बॅग खरेदी केल्या. शिवारातील शेतकऱ्यांनी एकाच दिवशी बियाण्याची पेरणी केली. मात्र 8 ते 10 दिवस उलटूनही केवळ 20,30,कुठे40% बियाण्याचीच उगवण (Chikhli Spurious Seeds) झाल्याच्या असंख्य तक्रारी विनायक सरनाईक यांना प्राप्त झाल्या आहेत.  एकलारा, वळती, चंदणपूर, डोंगरगाव, सोनेवाडी, खंडाळा, मकरध्वज,कव्हळा यासह विविध गावांमधून तक्रारी आल्या आहेत. यापैकी अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या कृषी विक्रेतेकडून बियाणे खरेदी केले आहे.याची कृषी विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.

याबत चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. अनेक शेतकऱ्यांना कंपन्यांकडून "शेतकरीच दोषी आहे" असे सांगितले जात आहे. तुमच्या शेतात पाऊस जास्त झाला किंवा खंड पडला, त्यामुळे नुकसान भरपाई देता येणार नाही, अशी कारणे देऊन तक्रारीच्या भानगडीत पडू नका असा सल्लाही दिला जातो. 
यामुळे शेतकरी बियाणे मोडून दुबार पेरणी करतात आणि होता-नव्हता पुरावा नष्ट करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा बोगस कंपन्यांविरुद्ध तक्रार करायची असल्यास कृषी विभागाकडे लेखी अर्ज सादर करावा किंवा कृषी सहायक, तलाठी यांना कळवावे. जेणेकरून पंचनामा होऊन या कंपन्यांची नोंद होईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.

तातडीने पंचनामे करा - विनायक सरनाईक

"पेरणी, नांगरट, डिझेल आणि मजुरीवर शेतकऱ्यांचा आधीच मोठा खर्च झाला आहे. आता बियाणे उगवले नाही त्यामुळे पुन्हा दुबार पेरणी करावी लागणार आहे. गेलेला वेळ परत येणार नाही आणि आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार आहे. शासनाने यात तात्काळ लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी. या बोगस कंपन्यांची चौकशी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी," अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी खालील मागण्या केल्या आहेत :
1.  दोषींवर कठोर कारवाई: बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनी आणि कृषी विक्रेत्यावर बियाणे कायदा 1966 आणि बियाणे नियंत्रण आदेश 1983 नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा.
2.  तात्काळ बियाणे उपलब्ध करून द्या: शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी संबंधित कंपन्या किंवा कृषी विक्रेत्याकडून तात्काळ मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे.
3.  नुकसान भरपाई: शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना कराव्यात.

"हा एका शेतकऱ्याचा प्रश्न नाही. तालुक्यात अशी अनेक प्रकरणे आहेत. कृषी विभागाने बाजारातील बियाण्याचे नमुने घेऊन तपासणी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा," असे सरनाईक म्हणाले.

शेतकऱ्यांनाच दोषी ठरवणाऱ्यांची कृषी विभागाने बोलती बंद करावी

शेतकरी रीतसर तक्रार करतात, मात्र बियाणे न उगवण्याला बियाणे निकृष्ट नसल्याचे भासवले जाते. पाणी जास्त पडले, कमी पडले, पेरणी मागे-पुढे झाली असेल असे विविध युक्तिवाद कंपनीचे प्रतिनिधी मांडतात. अशा "जावई शोध" लावणाऱ्यांची बोलती बंद करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा आणि कंपनीची बाजू मांडणाऱ्यांना जाब विचारावा, अशी मागणी सरनाईक यांनी केली. 

"एका गटातील धुर्याला धुरा असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकाच दिवशी पेरणी केली. एकाने घरगुती बियाणे पेरले ते उगवले, मात्र खाजगी कंपनीचे वाण उगवले नाही. पाऊसही त्या गटात एकाच दिवशी पडला. मग केवळ कंपनीच्या बियाण्याच्या शेतातच अवकाळी पाऊस पडला का?" असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला.  "अशा कंपन्यांचे बोलणे तिथेच खोडून काढा. अन्यथा आम्हाला याचे पुरावे सादर करून जाब विचारावा लागेल," असा इशाराही सरनाईक यांनी दिला.

मार्केटमधील महाबिजचे बियाणे सुद्धा उगवलेच नाही....

विविध कंपन्याचे बियाणे (Chikhli Spurious Seeds) कमी प्रमाणात उगवले असून यामध्ये महाबिजचे बियाणे देखील उगवले नसल्याच्या तक्रारी आहेत.विशेष म्हणजे कव्हळा,वळती, खंडाळा येथील शेतकऱ्यांनी चिखलीतील एकाच कृषी केंद्रावरुण हे बियाणे खरेदी केले आहे.त्यामुळे आता दोष बियाण्यास दिला जातो का शेतकऱ्यांला हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.