आमदार नितीन देशमुख

जिल्ह्यातील गारपीट व वादळी पावसामुळे मोठे नुकसान

MLA Nitin Deshmukh: अकोला जिल्ह्यात गारपीट व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आमदार नितीन देशमुख यांनी तात्काळ मदतीची मागणी केली.

जिल्ह्यातील गारपीट व वादळी पावसामुळे मोठे नुकसान

MLA Nitin Deshmukh

पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी: आमदार नितीन देशमुख यांची मागणी

पातूर (MLA Nitin Deshmukh) : अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध भागांत झालेल्या वादळी पावसासह गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे.

बाळापूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal rain) व गारपीट झाली. या गारपीटीमुळे कांदा, निंबू, आंबा, टरबूज, हरभरा, भुईमूग तसेच विविध भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांनाही फटका बसला असून अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. संबंधित यंत्रणांनी विलंब न करता शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत त्वरित द्यावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

तसेच गारपीटग्रस्त भागात विशेष पथके नियुक्त करून सर्वेक्षण जलद गतीने पूर्ण करावे, नुकसानाचा अचूक अहवाल शासनाकडे सादर करावा आणि मदत वितरणात कोणतीही दिरंगाई होऊ नये, अशीही मागणी आमदार देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी केली आहे. सध्या शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून एकीकडे उत्पादन खर्च वाढलेला असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे आणि संपूर्ण अहवालानंतर मदत देण्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.

Sep 28, 2026
महाराष्ट्रात 77 हजार कोटींचे शेती नुकसान? रोहित पवारांचा दावा; हेक्टरी 50 हजारांच्या मदतीची मागणी

महाराष्ट्रात 77 हजार कोटींचे शेती नुकसान? रोहित पवारांचा दावा; हेक्टरी 50 हजारांच्या मदतीची मागणी

रोहित पवारांचा महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेती नुकसानीवरून सरकारवर निशाणा. 77 हजार कोटींच्या नुकसानीचा दावा करत हेक्टरी 50 हजारांची मदत मागितली.

Sep 28, 2026
आदित्य ठाकरे कडून मोबाईल टॉर्च च्या उजेडात पीक नुकसानीची पाहणी

आदित्य ठाकरे कडून मोबाईल टॉर्च च्या उजेडात पीक नुकसानीची पाहणी

Aditya Thackeray: वसमत तालुक्यातील माळवटा शिवारात शनिवारी रात्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे वसमत तालुक्यात आले होते माळवटा शिवारात त्यांनी रात्री आठ साडेआठच्या सुमारास पाहणी केली

Sep 27, 2026
दुष्काळाचा केवळ जीआर, प्रत्यक्ष मदत कधी? सुधाकर देशमुखांचा सरकारवर हल्लाबोल

दुष्काळाचा केवळ जीआर, प्रत्यक्ष मदत कधी? सुधाकर देशमुखांचा सरकारवर हल्लाबोल

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार? सुधाकर देशमुखांचा सरकारला सवाल.

Sep 27, 2026
घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथे आदित्य ठाकरेंनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Sep 27, 2026