Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > देश

तामिळनाडू कारखाना स्फोट

तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट; 16 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Tamil Nadu Factory Explosion: तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनारपट्टी गावात फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.


तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट 16 जणांचा मृत्यू अनेक जण जखमी

Tamil Nadu Factory Explosion |

विरुधुनगर/ तमिळनाडु (Tamil Nadu Factory Explosion) : तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनारपट्टी गावातील फटाक्यांच्या कारखान्यात आज मोठा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत किमान 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, सहा जण जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, ही (Tamil Nadu Factory Explosion) घटना घडली, तेव्हा कामगार आकर्षक फटाक्यांच्या माळा तयार करत होते. हा कारखाना गोविंदनल्लूर येथील रहिवासी मुथू मणिक्कम यांच्या मालकीचा असल्याचे मानले जात आहे. स्फोट इतका शक्तिशाली होता की, संपूर्ण परिसरात घबराट पसरली, ज्यामुळे बचाव कार्यासाठी आपत्कालीन पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने विरुधुनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

अनेक जखमींची प्रकृती गंभीर

अधिकाऱ्यांनी या (Tamil Nadu Factory Explosion) दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या काही जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर असून, डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (CM M. K. Stalin) यांनी या (Tamil Nadu Factory Explosion) अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य हाती घेण्याचे तसेच जखमींवर उपचार करण्याचे निर्देश दिले. स्टॅलिन म्हणाले की, "विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टपट्टी येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात अनेक लोकांच्या मृत्यूच्या दुःखद बातमीने मला खूप दुःख झाले आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो."

मुख्यमंत्री (CM M. K. Stalin) म्हणाले की, "मी मंत्री के. के. एस. आर. रामचंद्रन आणि थंगम तेन्नारासू यांना बचाव कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी आणि पीडित कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याची विनंती केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही सर्व आवश्यक मदत सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."

 

Related to this topic: