Jantar Mantar

नरेंद्र मोदींवर अभिजित दीपके यांचा घणाघात; आता पंतप्रधानांच्या राजीनाम्याचीही मागणी

जंतरमंतर येथे आंदोलनादरम्यान पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटविल्यानंतर (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

नरेंद्र मोदींवर अभिजित दीपके यांचा घणाघात; आता पंतप्रधानांच्या राजीनाम्याचीही मागणी

Jantar Mantar

सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून हटवल्यानंतर CJP संस्थापक अभिजित दीपके यांचा संताप; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरही गंभीर आरोप

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे आंदोलनादरम्यान पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटविल्यानंतर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आतापर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होतो, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दीपके यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. देशाच्या इतिहासात अनेक महान पंतप्रधान होऊन गेले, मात्र नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीमुळे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेलाच धक्का बसत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दीपके म्हणाले की, NEET प्रकरणात 20 हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित जबाबदारी निश्चित होईल आणि सरकार योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दोषींवर कारवाई करण्याऐवजी न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि आंदोलनकर्त्यांवर पोलिस कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याचाही दावा त्यांनी केला.

धर्मेंद्र प्रधान यांच्याबाबत बोलताना दीपके यांनी, "सरकार त्यांचे इतके संरक्षण का करत आहे?" असा प्रश्न उपस्थित केला. 20 हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूपेक्षा धर्मेंद्र प्रधान अधिक महत्त्वाचे आहेत का, असा सवाल करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटविल्याचा उल्लेख करताना दीपके भावूक झाले. त्यांनी दावा केला की, वांगचुक यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देण्यात आली. 60 वर्षीय व्यक्ती सलग 20 दिवस उपोषणावर असताना त्यांना जबरदस्तीने हलविण्यात आले, तसेच त्यांच्याशी गैरवर्तन आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. वांगचुक यांना आंदोलनस्थळ सोडण्याची इच्छा नव्हती, असेही दीपके म्हणाले.

यावेळी दीपके यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करत, न्यायासाठीचा लढा मागे हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.

संबंधित सामग्री

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026