Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > देश

Ink Attack

उपोषणकर्ते अभिजीत दीपके यांच्यावर शाईफेक, महिला ताब्यात! सुरक्षा वाढवली..!

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शनिवारी एक धक्कादायक घटना घडली.


उपोषणकर्ते अभिजीत दीपके यांच्यावर शाईफेक महिला ताब्यात सुरक्षा वाढवली

Ink Attack |

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत आंदोलनकर्त्यांना जबाबदार ठरवत अज्ञात महिलेचा संताप; पोलिसांनी तातडीने घेतले ताब्यात

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण करत असलेले मराठी तरुण अभिजीत दीपके यांच्यावर एका अज्ञात महिलेने शाई फेकल्याची घटना घडली. यावेळी संबंधित महिलेने दीपके यांच्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि आंदोलक सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पोलिसांनी रुग्णालयात हलविले होते. या घटनेमुळे संतप्त झालेल्या महिलेने वांगचुक यांच्या प्रकृतीसाठी आंदोलनकर्त्यांनाच जबाबदार धरत आंदोलनस्थळी गोंधळ घातला आणि अभिजीत दीपके यांच्यावर शाई फेकली.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जंतर-मंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि दिल्ली पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित महिलेला ताब्यात घेतले.

या घटनेनंतर आंदोलनस्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. या प्रकारानंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे.

Related to this topic: