जयपूर आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला; कार्यकर्त्यांमध्ये संताप

शहीद स्मारक परिसरात सुरू असलेल्या आंदोलनावेळी एका अज्ञात तरुणाने अचानक त्यांच्यावर हल्ला केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

जयपूर आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला; कार्यकर्त्यांमध्ये संताप

Abhijeet Dipke

शहीद स्मारकावरील आंदोलनादरम्यान अज्ञात तरुणाची मारहाण; पोलिसांकडून आरोपीचा शोध, घटनास्थळी तणावाचे वातावरण

जयपूर (Abhijeet Dipke) : शिक्षण व्यवस्था, भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि वाढत्या बेरोजगारीविरोधात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जयपूरमध्ये खळबळ उडाली आहे. शहीद स्मारक परिसरात सुरू असलेल्या आंदोलनावेळी एका अज्ञात तरुणाने अचानक त्यांच्यावर हल्ला केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

माहितीनुसार, कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सोमवारी जयपूर येथील शहीद स्मारकावर विविध सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांवर आंदोलन आयोजित करण्यात आले होते. नीट परीक्षेतील पेपरफुटी, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यांवर हे आंदोलन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, युवक, पालक आणि महिलांची मोठी उपस्थिती होती.

याच आंदोलनादरम्यान पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके घटनास्थळी पोहोचले असताना एका तरुणाने अचानक त्यांच्याजवळ येत त्यांच्यावर हल्ला केला. संबंधित तरुणाने दिपके यांना कानशिलात लगावल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. अभिजीत दिपके यांच्या समर्थकांनी तत्काळ त्या तरुणाला पकडून त्याला मारहाण केल्याचेही सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि मोठी धावपळ उडाली.

दरम्यान, परिस्थिती चिघळू नये यासाठी अभिजीत दिपके यांनी स्वतः कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून हल्लेखोराचा शोध सुरू करण्यात आला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपास यंत्रणा विविध अंगांनी चौकशी करत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीचा माग काढण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे, आंदोलनात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने काही नागरिकांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. अनेकांनी आपले मोबाईल हरवल्याची माहिती आयोजकांना दिल्यानंतर व्यासपीठावरून नागरिकांना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरट्यांपासून सावध राहण्याचा इशाराही देण्यात आला.

हल्ला आणि चोरीच्या घटनांमुळे आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिस आणि आयोजकांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

संबंधित सामग्री

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026
CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPचे शिवाजी पार्कात आंदोलन; तुकाराम मुंढेंना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी, तरुणांचा मोठा सहभाग.

Oct 02, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026