Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > देश

त्रिशा उदयनिधी

त्रिशा टिप्पणीवर उदयनिधी ताब्यात; अश्लील वक्तव्यामुळे राजकीय वाद चिघळला..

Trisha Udyanidhi controversy : अभिनेत्री त्रिशा यांच्याबाबत कथित अश्लील आणि द्वयर्थी टिप्पणी केल्याच्या आरोपावरून तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेतल्याने राज्यातील राजकारण तापले आहे


त्रिशा टिप्पणीवर उदयनिधी ताब्यात अश्लील वक्तव्यामुळे राजकीय वाद चिघळला

Trisha Udyanidhi controversy |

चेन्नई (Trisha Udyanidhi controversy) : अभिनेत्री त्रिशा यांच्याबाबत कथित अश्लील आणि द्वयर्थी टिप्पणी केल्याच्या आरोपावरून तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेतल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. कावेरी पाणी वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय (थलपती विजय) यांच्यावर टीका करताना एका सभेत गर्दीतून "त्रिशा, त्रिशा" अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर उदयनिधी यांनी भाषण थांबवत केलेल्या कथित टिप्पणीवरून वाद निर्माण झाला. या वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

उदयनिधी (Trisha Udyanidhi controversy) यांनी मात्र आपण कोणाचेही नाव घेतले नसून काहीही चुकीचे बोललो नाही, असा दावा केला आहे. या प्रकरणाचा अंतिम निर्णय न्यायालय घेईल आणि त्याचे परिणाम भोगण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, तामिळनाडू भाजपाचे मुख्य प्रवक्ते नारायणन तिरुपती यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी ही टिप्पणी घृणास्पद, अश्लील आणि महिलांचा अपमान करणारी असल्याचे सांगत उदयनिधी यांना अटक करून तुरुंगात पाठवावे, अशी मागणी केली. या प्रकरणात न्यायालय पुढे काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.