रिसोड (Risod tractor accident) : दुधाच्या क्यानी घेऊन येत असलेल्या चार चाकी इंट्रा वाहनाने अध्यात ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीरित्या जखमी झाला आहे. ही घटना दिनांक 24 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता रिसोड सेनगाव मार्गावर मुंगसाजी नगर जवळ घडली. अपघात एवढा भीषण होता की मृतकास काढण्यासाठी एक ते दीड तास लागला. यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली. घटनेनंतर अज्ञात ट्रॅक्टर घटनास्थळावरून पसार झाला आहे.
वैजनाथ भाऊराव मुकाडे वय 24 वर्ष राहणार खिलार तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली असे मृतकाचे नाव असून वाहन चालक दतराव धुरपतराव चिलधर वय 26 वर्ष राहणार खिलार तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली असे जखमीचे नाव असून जखमीस प्रथम रिसोड येथील ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले तर पुढील उपचारासाठी वाशीम येथे पाठवण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, (Risod tractor accident) हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात घेत असलेला खिलार येथील दतराव धुरपतराव चिलधर हे आपल्या एका अन्य साथीदार वैजनाथ भाऊराव मुकाडे याच्यासह आपले इंट्रा वाहन क्रमांक एम एच 38 एक्स 3890 ने सेनगावच्या दिशेने रिसोड कडे दुधाच्या कॅन घेऊन येत असताना रात्री अकरा वाजता च्या दरम्यान समोरून चालत असलेल्या एका अज्ञात ट्रॅक्टरला जबर धडक दिली.
या (Risod tractor accident) धडकेत कंडक्टर साईटचा वाहनाचा अक्षरचा चुराडा झाला यामध्ये वैजनाथ मुकाडे याचा जागीच मृत्यू झाला तर दतराव चिलधर हे गंभीरित्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनची पोलीस उपनिरीक्षक गीते हे घटनास्थळी दाखल झाले या ठिकाणी पाहणी केली व स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीस रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले व तसेच मृतकास एक ते दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढून रिसोड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी दाखल केले. दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी मृतकावर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह परिवारात सुपूर्द करण्यात आले. सदर घटनेस कारणीभूत ट्रॅक्टरचा रिसोड पोलीस शोध घेत आहे. याप्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली नाही पुढील तपास रिसोड पोलीस करत आहे.
रिसोडमध्ये चार चाकी वाहनाची ट्रॅक्टरला धडक, एक ठार
Risod tractor accident: रिसोडमध्ये 24 एप्रिल रोजी रात्री एका चार चाकी वाहनाने ट्रॅक्टरला धडक देऊन एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघात भीषण होता.
Risod tractor accident
संबंधित सामग्री
हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर
Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्याचा उपचारा दरम्यान मृत्यू
Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी
नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना
Chondiamba Armed Attack Death: वसमत तालुक्यातील चोंडी आंबा टी-पॉईंटवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात ६ ऑक्टोबर मंगळवार रोजी धारदार शस्त्राने हल्ला
अविनाश बांगरच्या शौर्याचा शेवट; दुसर्यासाठी जीव दिला: स्वत काळाच्या पडद्या आड गेला
Avinash Bangar's death: हिंगोली येथे फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगी अविनाश काशिनाथ बांगर यांनी दुसर्यांचे प्राण वाचवण्यासाठी धाव घेतली आणि या प्रयत्नातच त्यांनी स्वतःचा प्राण गमावला.