कुरुंदा (Chondiamba Armed Attack Death) : वसमत तालुक्यातील चोंडी आंबा टी-पॉईंटवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात ६ ऑक्टोबर मंगळवार रोजी दुपारी ३.५० ते ४ वाजण्याच्या दरम्यान धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली.
या (Chondiamba Armed Attack Death) हल्ल्यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशनशी संबंधित महेश अण्णाराव शेळके वय ४० या उच्चपदस्थ अधिकार्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अज्ञात आरोपीने हल्ला केल्याचे सांगितले जात असून, कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव पुरी यांचे पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व पुरावे संकलन सुरू होते.मृत व्यक्तीला दोन मुले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. अधिकृत ओळख व आरोपीबाबत पोलीस तपासानंतरच स्पष्टता येईल. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पुढील तपास कुरुंदा पोलीस करीत आहेत.
चोंडीआंबा शस्त्र हल्ला मृत्यू
शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना
Chondiamba Armed Attack Death: वसमत तालुक्यातील चोंडी आंबा टी-पॉईंटवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात ६ ऑक्टोबर मंगळवार रोजी धारदार शस्त्राने हल्ला
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Chondiamba Armed Attack Death