परभणी दुचाकी चोरी

परभणीत लिफ्ट मागितली अन् दुचाकीसह केला पोबारा!

Parbhani Bike theft: परभणीत एका दुचाकीस्वाराने अनोळखी व्यक्तीला लिफ्ट दिली आणि त्याने त्याची दुचाकी व मोबाईल चोरून पळ काढला. जिंतूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन दुचाकी जप्त केली.

परभणीत लिफ्ट मागितली अन् दुचाकीसह केला पोबारा!

Parbhani Bike theft

हिंगोली जिल्ह्यातून चोरट्यास घेतले ताब्यात जिंतूर पोलिसांची कामगिरी

परभणी (Parbhani Bike theft) : जिंतूर तालुक्यातील एका दुचाकीस्वाराला अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे चांगलेच महागात पडले. मैनापूरी पाटीवर हात दाखवून जिंतूर शहरात सोडा म्हणणार्‍या भामट्याने बोलबच्चन करत दुचाकीस्वाराला जेवणासाठी  नेले. मात्र तो दुचाकीस्वार जेवणाची ऑर्डर देत असताना भामट्याने त्यांची दुचाकी (Parbhani Bike theft) व मोबाईलसह पोबारा केला. मात्र जिंतूर पोलिसांनी त्याचा शोध काढून भामट्याला ताब्यात घेतले.याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की,जालना जिल्ह्यातील विलास जनार्धन पवार हे ४ जुलै २०२ ५ परभणीहून त्यांच्या एमएच -२१ सीई - ९२७५ या क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे जात होते. मैनापूरी पाटीजवळ जय सेवालाल म्हणून एका इसमाने त्यांना हात दाखवला. जिंतूरपर्यंत सोडण्याची विनंती केली.

माणूसकीच्या नात्याने विलास पवार यांनी त्या इसमाला लिफ्ट दिली. (Parbhani Bike theft) जिंतूरमध्ये आल्यानंतर त्या इसमाने दारु पिण्याच्या बहाण्याने पवार यांना एका दुकानात केले. त्यानंतर जेवण करण्यासाठी गल्लीतील एका हॉटेलात नेले. विलास पवार हे जेवणाची ऑर्डर देत असताना इसम संधी साधून त्यांची दुचाकी व गाडीत ठेवलेला मोबाईल पसार झाला. या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि. गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोध घेतला. मिळालेल्या माहिती नुसार आरोपी गजानन सुभाष जाधव, २६ वर्ष रा. जांब ता.सेनगावक हिंगोली या तरुणास ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी जप्त केली. ही कारवाई अंमलदार दिपक वाटोडे, सुनिल राठोड यांच्या पथकाने पार पाडली. त्यांना सायबर सेलचे गणेश कौटकर, स्वप्निल पोतदार यांची तांत्रिक मदत मिळाली.

संबंधित सामग्री

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक; हिरानंदानीतील प्रकरणात कारवाई

मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक; हिरानंदानीतील प्रकरणात कारवाई

हिरानंदानीतील विकासकाच्या तक्रारीनंतर मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांनी अटक केली. फसवणूक आणि खंडणी प्रकरणात चौकशी सुरू.

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026