नवरदेव आत्महत्या

दोन दिवसांवर लग्न: भावी नवरदेवाची गळफास घेऊन आत्महत्या

Groom committed suicide: सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे लग्नाच्या दोन दिवसाआधी नवरदेव आनंदा गांधिले यांनी आत्महत्या केल्याने गावात शोक पसरला. त्याचे लग्न ७ मे रोजी होणार होते.

दोन दिवसांवर लग्न: भावी नवरदेवाची गळफास घेऊन आत्महत्या

(Groom committed suicide)

वाघजाळी गावावर शोककळा

सेनगाव (Groom committed suicide) : लग्नाच्या अवघ्या दोन दिवस आधी भावी नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे घडली आहे. या घटनेमुळे आनंदाच्या वातावरणात अचानक शोककळा पसरली असून संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. मृत तरुणाचे नाव आनंदा हरिभाऊ गांधिले वय २७, व्यवसाय – शेती, रा. वाघजाळी, असे आहे. विशेष म्हणजे, दि. ७ मे रोजी त्याचा विवाह निश्चित झाला होता. घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच आनंदा यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा गांधिले यांनी त्यांच्या नव्याने सुरू असलेल्या घराच्या बांधकामस्थळी छतावरील फॅनच्या कडीला सूती दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना दि. ४ मेच्या रात्री ते ५ मेच्या सकाळी दरम्यान घडल्याचा अंदाज आहे. सकाळी घटना उघडकीस येताच नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह (Groom committed suicide) पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या (Groom committed suicide) प्रकरणी माहिती अमोल तुकाराम गांधिले पोलीस पाटील यांनी पोलिसांना दिली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, लग्नासाठी सजलेले घर आणि त्याच घराच्या बांधकामस्थळी घडलेली ही घटना गावकऱ्यांच्या मनाला चटका लावणारी ठरली आहे. आनंदाच्या स्वागतासाठी सजणारे घरच दुःखाचे केंद्र बनल्याने वाघजाळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी

Hingoli Suicide-affected farmer: दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून इसापूर-रमणा येथील शेतकरी विठ्ठल फकीरा वाढवे यांनी चार दिवसांपूर्वी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

Oct 06, 2026
नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Parda Farmer suicide: तालुक्यातील पारडा  येथील ५० वर्षीय अल्पभुधारक शेतकर्‍यावर  बँकेचे कर्ज व कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे  त्याने  चिंतेत राहून विषारी औषध पिऊन  आत्महत्या केल्याची घटना

Oct 04, 2026
नोएडाच्या सुपरनोव्हा सोसायटीत धक्कादायक घटना; ४३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

नोएडाच्या सुपरनोव्हा सोसायटीत धक्कादायक घटना; ४३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

नोएडाच्या सेक्टर-९४ येथील सुपरनोव्हा सोसायटीत गुरुग्रामच्या संभव जैन या तरुणाने ४३व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांचा तपास सुरू आहे.

Oct 03, 2026
पाऊस लांबला, विहिरी आटल्या, जनावरे दगावली आणि कर्जाचा भार वाढला!

पाऊस लांबला, विहिरी आटल्या, जनावरे दगावली आणि कर्जाचा भार वाढला!

Drought-Affected Farmers Suicides: आटलेल्या विहिरी, पशुधनाचे नुकसान आणि वाढता कर्जाचा भार अशा संकटांचा सामना करताना सोलापूर जिल्ह्यातील 18 वर्षीय तरुण शेतकरी प्रथमेश अनिल खरात याने आत्महत्या

Sep 30, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026