पारडा शेतकरी आत्महत्या

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Parda Farmer suicide: तालुक्यातील पारडा  येथील ५० वर्षीय अल्पभुधारक शेतकर्‍यावर  बँकेचे कर्ज व कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे  त्याने  चिंतेत राहून विषारी औषध पिऊन  आत्महत्या केल्याची घटना

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Parda Farmer suicide

 

हिंगोली तालुक्यातील पारडा येथील घटना

हिंगोली (Parda Farmer suicide) : तालुक्यातील पारडा  येथील ५० वर्षीय अल्पभुधारक शेतकर्‍यावर  बँकेचे कर्ज व कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे  त्याने  चिंतेत राहून विषारी  औषध पिऊन  आत्महत्या केल्याची  घटना  घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

या बाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील पारडा येथील राजुअप्पा भिमाअप्पा तोरकड (५०) या अल्प भुधारक  शेतकर्‍याकडे दिड एकर शेती असून त्याने शेतीसाठी कर्ज  घेतले होते. यावर्षी तोरकड या शेतकर्‍याने शेतात सोयाबीनसह इतर पिके घेतली होती. मागील महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनसह इतर पिके वाळून गेली. त्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने आपल्यावरील कर्ज  कसे  फेडावे व सणवार कसे  करावे  या चिंतेमध्ये तो होता. २८ सप्टेंबरला सकाळच्या सुमारास मुलगा शेतामध्ये गेला होता आणि पत्नी देखील बाहेर गेली होती. घरी कोणीही नसल्याची संधी साधून राजुअप्पा तोरकड  यांनी विषारी औषध प्राशन केले.

जवळपास असलेल्या शेजार्‍यांना हि बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्यांचा मुलगा तुकाराम तोरकड यांना माहिती दिली. त्याने घराकडे धाव घेवून उपचाराकरीता हिंगोलीतील शासकीय रुग्णालयात  दाखल केले. उपचारादरम्यान ३ ऑक्टोबर राजुअप्पा तोरकड यांचा  मृत्यू झाला. या (Parda Farmer suicide) बाबतची माहिती तुकाराम  तोरकड यांनी बासंबा पोलिसात दिल्याने आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास  सहाय्यक पोलिस  निरीक्षक  विकास आडे, जमादार विष्णु पोले, अनिल डुकरे हे करीत आहेत. दरम्यान राजुअप्पा तोरकड यांच्यावर  अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा  परिवार  आहे.

टैग्स: Farmer suicide in Parda